चालक संतापले 
सातारा

चुकला काळजाचा ठाेका... चालकाविनाच चाललेल्‍या मोटारीचा अखेर टळला धोका...

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : येथील वडूज- कऱ्हाड रस्त्यावर स्टेट बॅंकेच्या परिसरात नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेतच असा चालकाविना चारचाकी रस्त्याने धावण्याचा प्रकार आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. बॅंकेच्या परिसरात परगावाहून आलेली एक चारचाकी रस्त्यावरच उभी करून चालक काहीतरी साहित्य खरेदी करण्यासाठी नजीकच्या दुकानात गेला. 

चालक दुकानात जात असतानाच इकडे न्यूट्रल कंडिशनमध्ये असलेली चारचाकी उतारामुळे हळूहळू पुढे पुढे सरकू लागली. काही क्षणांत चारचाकी वाहनाने थोडाफार वेग घेतला होता. चालकाविना चारचाकी पुढे जात असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्या वेळी नागरिकांनी आरडाओरडा करून इतर नागरिकांना सावध करण्याचा प्रयत्न केला. मुख्य रस्त्यावर व गजबजलेल्या बाजारपेठेत असणारे हे चारचाकी वाहन अचानकपणे चालकाविना धावत असल्याचे पाहून नजीकचे नागरिक सैरावैरा धावू लागले. काही नागरिक वाहनाच्या पाठीमागे ओढून वाहन थांबविण्याचा प्रयत्न करीत होते. 

रस्त्याला उतार असल्याने वाहन जादा वेग धारण करीत होते. वाहन थांबविण्याचे नागरिकांचे प्रयत्न व्यर्थ ठरत होते. सुमारे शंभर ते दिडशे फूट अंतरात हा सगळा थरार सुरू होता. अखेरीस वाहन उजव्या दिशेला वळून एका नजीकच्या दुकानाच्या दिशेने जाऊ लागले. त्या वेळी एका युवकाने प्रसंगावधान राखत वाहनात प्रवेश करून स्टेअरिंगवर ताबा मिळविला. तोपर्यंत अगदी दुकानाच्या नजीक वाहन पोचले होते, त्या वेळी काही नागरिकांनी पंक्‍चर दुकानासमोरील टायर वाहनाला आडवे टाकून वाहन थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेरीस युवकाने ब्रेक मारून वाहन थांबविल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. वाहनचालकाने घडल्या प्रकाराबद्दल सर्वांची माफी मागितली. भर दुपारी बाजारपेठेत गजबजलेल्या वेळेत घडलेल्या या थरारक प्रकाराची चर्चा मात्र नागरिकांत दिवसभर होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Viral Video : “अरे जल्दी कर, सुबह पनवेल निकलना है” म्हणताच प्राध्यापक भडकले; विद्यार्थ्याची स्टेजवरच धरली गचांडी, VIDEO VIRAL

IND A vs AUS A: भारताच्या विजयात 'मुंबई'कर चमकले! ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले, मालिकेत १-० ने आघाडी

ती बाहेर मोठी सेलिब्रिटी असेल पण घरी... अपूर्वा नेमळेकरबद्दल काय म्हणाले सासरे; दीर म्हणतात- तिने सहा महिने...

Lalbaugcha Raja: पालखी निघाली राजाची...! लालबागच्या राजाची निरोपाची आरती; डोळे पाणावणारा क्षण VIDEO

Maharashtra Ganesh Visarjan Live: मनाचा तिसरा गुरुजी तालीम मिरवणुकीत ढोल ताशांची अफलातून जुगलबंदी

SCROLL FOR NEXT