सातारा

पाच वर्षांच्या चिमुकलीला आईने गॅलरीतून फेकून दिले

सकाळ वृत्तसेवा

सातारा : पाच वर्षांच्या चिमुकलीला गॅलरीतून फेकून देऊन तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सावत्र आईवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जयश्री संतोष जाधव (रा. म्हसवे) असे गुन्हा दाखल झालेल्या सावत्र आईचे नाव आहे.

याबाबत सोनाली संतोष जाधव (रा. गोडोली, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. पती संतोष आणि सोनालीचे पटत नसल्यामुळे संतोषने जयश्रीसोबत दुसरे लग्न केले. संतोष आणि जयश्री हे दोघे म्हसवे येथील अपार्टमेंटमध्ये राहात आहेत, तर सोनाली या गोडोलीत राहतात. त्या दोघांकडे सोनाली यांची पाच वर्षांची मुलगी राहते. 19 जूनला पाच वर्षांच्या चिमुकलीला जयश्रीने गॅलरीतून खाली फेकले. त्यामध्ये ती जखमी झाली.

तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार सोनालीला समजल्यानंतर चिमुकलीला पोलिसांसोबत घेऊन दवाखान्यात गेली. त्यावेळी पाच वर्षांच्या चिमुकलीने आईला "मला जयश्री आईने गॅलरीतून खाली फेकले', असे सांगितले. हा प्रकार गंभीर असल्याने पोलिसांनी तत्काळ सावत्र आई जयश्रीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.

शिरवळ आजपासून सात दिवस बंद : नागरिकांचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: महाराष्ट्रात शिंदेसेनेचा मोठा धमाका! ३ कॅबिनेट मंत्र्यांवर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या बदलांनी राजकारणात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

Mumbai News: BKC मध्ये थरार! जिओ वर्ल्ड ड्राईव्हजवळ ७ फूट अजगर आढळला; पाहा व्हायरल व्हिडिओ

"काम करणारे लोक भिकारी नाहीत.." मानधन बुडवणाऱ्या निर्मात्यांवर संतापली निळू फुलेंची लेक

SCROLL FOR NEXT