सातारा

साताऱ्यातील तीन हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश जुगारून हॉटेल सुरू ठेवल्याने शाहूपुरी पोलिसांनी साताऱ्यातील तीन हॉटेल मालकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश जुगारून शहरातील ही तीन हॉटेल्स पार्सल सुविधा देण्याऐवजी ग्राहकांना सेवा देत होते.

या प्रकरणी यादोगोपाळ पेठेतील श्रीराम वडापाव सेंटर क्रमांक तीनचे मालक अशोक बजरंग पवार (रा. शाहूनगर), हॉटेल भोलाचे मालक संदीप सचिन गायकवाड (रा. व्यंकटपुरा पेठ), तसेच राजवाडा चौपाटीजवळील प्रकाश फास्ट फूड व स्नॅक सेंटरचे मालक केदार उल्हास भोसले (रा. समर्थमंदिर) यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन व आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हवालदार ओंकार अंकुश यादव यांनी तक्रार दिली आहे.

बैठकीतच उदयनराजे म्हणाले ज्या ठिकाणी अडचण आहे, तेथे मला सांगा 

उत्तर प्रदेशातील दोघा युवकांवर गुन्हा 

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्हा बंदीचे उल्लंघन करून दुचाकीवरून गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथून दौलतनगर सातारा येथे आलेल्या दोघा युवकांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सुरजकुमार श्रीमुलचंद वर्मा (वय 21) व श्‍याम मुन्नी वर्मा (वय 20) दोघे रा. वृदांवन कॉलनी, दौलतनगर, मूळचे गोरखपूर वस्ती (उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना परवानगी सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्याप्रमाणी संबंधित युवकांवर हवालदार धनंजय कुंभार यांनी शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

सातारा : आठ तालुके, 48 बाधित : वाचा तुमच्या परिसरातील किती रुग्ण?

सांगलीचा कोरोनाबाधित काले गावातील घरात जेवला अन् गावात पसरली धास्ती... 
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

Pune News: लोहगड दरीत तरुण व्यावसायिकाच्या मृत्यूचे गूढ उकलले; ४० हून अधिक साक्षीदार, डिजिटल पुराव्यांची सांगड

अरविंद केजरीवालांसह कुटुंबातील ५ जणांना निवडणूक आयोगाकडून नोटीस, कारण काय?

SCROLL FOR NEXT