सातारा

बॅंक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी क्वॉरंटाईन; काेठे घडला हा प्रकार वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या येथील शाखेतील कर्मचारी बाधित सापडल्याने बॅंकेच्या शाखेतील सर्वच कर्मचारी क्वॉरंटाईन केले आहेत. आरोग्य यंत्रणा व पालिकेने शाखाही सील केली आहे. 

दरम्यान, सातारा पालिकेतील महिला कर्मचाऱ्याशी त्या कर्मचाऱ्याचा विवाह ठरला होता. त्याचा बस्ताही काही दिवसांपुर्वी सातारा येथे झाला. त्याच बस्त्यातून कोरोनाचा प्रसार झाला असावा, असा यंत्रणेचा अंदाज आहे. विवाह ठरलेली संबंधित महिला कर्मचारी दोन दिवसांपुर्वी साताऱ्यात बाधित ठरली आहे. त्यांच्या संपर्कात आलेला कर्मचारीही आज (रविवार) पॉझीटिव्ह आला. त्यामुळे ते कोणाकोणाच्या सहवासात आले, त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जात आहे, अशी माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.
 
महाराष्ट्र बॅंकेच्या येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयासमोर शाखेत संबंधित कर्मचारी कार्यरत आहे. तर विद्यानगर येथील कॉम्पलेक्‍समध्ये तो राहतो. तो बॅंकेतील कर्मचारी यांच्या संपर्कात आला आहे. त्यामुळे त्या शाखेचा सर्व कर्मचारी क्वारंटाईन केले आहेत. त्याशिवाय अलिकडच्या चार ते पाच दिवसात बॅंकेत किती लोक आले. त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या थेट संपर्कात कितीजण आले, याचाही शोध घ्यावा लागणार आहे. शहरात कोरोनाबाधीतांची संख्या दहावर पोचली आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. नऊ जणांवर उपचार सुरू आहेत. 

सातारा पालिकेतील कर्मचारी महिला यापूर्वी पॉझिटिव्ह आली होती. तिच्याशी संबंधीत कर्मचाऱ्याचा विवाह ठरला आहे. दरम्यान, या घटनेनंतर बॅंकेचे कामकाज बंद ठेवून सॅनिटायझिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील दोन दिवस बॅंक बंद ठेवली जाणार आहे. त्यानंतर जोपर्यंत बॅंक बदली स्टाफ देत नाही, तोपर्यंत शाखा चालू केली जाणार नाही, असे मुख्याधिकारी डांगे यांनी स्पष्ट केले.

अखेर आलाच ताे... कोयनानगर राहणार कडकडीत बंद
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ९ वर्षांच्या मुलासमोर घडली धक्कादायक घटना

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT