सातारा

अनलॉक 1 : सांगली सातारा जिल्ह्यातील रहिवाशांना 'ही' ठरतेय अडचण

संजय जगताप

मायणी, (जि.सातारा) : आंतरजिल्हा प्रवेशबंदीने रखडलेली कामे आणखी लांबणीवर पडत आहेत. कलेक्‍टरसाहेब आम्ही कामावर जायचं कसं, असा सवाल सीमावर्ती भागातील नोकरदार, कामगार, शेतकरी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकही करीत आहेत. त्यांना बिगरपास ये-जा करण्याची मुभा देण्याची आवश्‍यकता आहे.
 
दैनंदिन गरजा भागविण्यासाठी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील अनेक नागरिकांना सतत जिल्हाहद्दी ओलांडून बाजारपेठेच्या मोठ्या गावात ये-जा करावी लागते. अनेकदा अत्यावश्‍यकता असूनही पोलिस पासाशिवाय सोडत नाहीत. वारंवार पास काढण्याऐवजी स्थानिकांना ठोस पुराव्याच्या आधारे जिल्हा हद्दीवर न अडवता कामाला जाण्याची मुभा देणे आवश्‍यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व जिल्हाहद्दी बंद केल्या आहेत. मे अखेर लॉकडाउन संपेल व जिल्हाहद्दी विनाअट पूर्ववत रहदारीसाठी खुल्या होतील, अशी बहुतेकांची अपेक्षा होती. मात्र, अनलॉक-1 मुळे साऱ्या अपेक्षांवर पाणी फिरले. रहदारीच्या मोठ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी तपासणी नाके सुरूच ठेवले आहेत. अनेक रस्ते गावकऱ्यांच्या मदतीने प्रशासनाकडून सील केले आहेत. चेकपोस्टवर पोलिसांकडून वाहने अडवून सर्वांगीण चौकशी केली जात आहे. विहित पासाची मागणी करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग, प्रादुर्भाव टाळण्यासाठी तशी खबरदारी घ्यायलाच हवी. मात्र, सीमावर्ती भागातील अनेक नागरिक, नोकरदार, कामगार व शेतकरी आदींना शेजारील जिल्ह्यातील गावांत दैनदिन गरजा भागविण्यासाठी वारंवार ये-जा करावे लागतेय. किराणा माल, भाजीपाला, पिठाची गिरणी, मेडिकल स्टोअर, वैद्यकीय सुविधा, शेतीमालाची खरेदी-विक्री, खते, औषधे, बी-बियाणे, बॅंकांतील कामे अशा अनेक कामांसाठी ये-जा करावी लागते. अनेक बांधकाम कामगार, नोकरदारांना दररोज ये-जा करावी लागते. मात्र, पासअभावी त्यांची गोची होत आहे, कामे रखडत आहेत. मायणीलगतच्या परंतु सांगली जिल्ह्यातील माहुली, वलखड, भिकवडी, चिखलहोळ आदी गावांतील शेकडो लोकांना बाजारहाटासाठी मायणीतच यावे लागते. शेतीमालाची खरेदी-विक्री, बी-बियाणे, खते, औषधे, आरोग्य सुविधा आदींसाठी जवळ दुसरी बाजारपेठ नाही. तसेच सातारा जिल्ह्यातील मायणीसह चितळी, विखळे, कलेढोण, पाचवड, म्हासुर्णे, निमसोड (ता.खटाव) परिसरातील लोकांना विटा (जि.सांगली) येथील मोठ्या बाजारपेठेत खरेदी-विक्री व वैद्यकीय सेवा-सुविधांसाठी जावेच लागते. विटा येथे मोठ्या संख्येने राहत असलेल्या बांधकाम कामगारांना मायणी व परिसरात येता येत नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. पावसाच्या आधी ती पूर्ण होणे आवश्‍यक आहे. 

जिल्हाहद्द बंदीमुळे कामगार येऊ शकत नाहीत. त्यामुळे शाळा इमारतींसह अनेक खासगी बांधकामे खोळंबली आहेत. कामानिमित्त दैनदिन ये-जा करणाऱ्या लोकांसाठी प्रशासनाने मार्ग काढावा, अशी मागणी मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ सचिव सुधाकर कुबेर यांनी केली आहे. 

चला खेळूया : छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात काय सुरू, काय बंद वाचा

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

SCROLL FOR NEXT