Satara 
सातारा

पुणे-मुंबईला गेलो नाही, मला नाही कोरोनाची भीती, हा केवळ भ्रम असल्याचे प्रशासनाचे मत

सकाळ वृत्तसेवा

फलटण (जि. सातारा) : फलटण तालुक्‍याच्या विविध गावांतून कोरोना बाधितांची संख्या 81 इतकी झाली असून, यातील बहुतांश रुग्ण हे मुंबई व पुण्याशी संबंधित आहेत, तर अन्य रुग्ण हे कोरोना बाधितांच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे "मी पुणे, मुंबईला गेलो नाही, मला कोरोना होणार नाही,' या भ्रमात नागरिकांनी राहू नये. आपल्या आरोग्याची आपणच काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. दरम्यान, कोळकी येथे मुंबईहून आलेली आणखी एक व्यक्ती कोरोना बाधित झाली आहे. 

मुंबई, पुणे व अन्य ठिकाणांहून फलटण तालुक्‍यात विविध कारणांस्तव आलेल्या नागरिकांची संख्या हजारांच्या घरात गेलेली आहे. यात मुंबईकर अधिक आहेत. बाहेरगावाहून आलेल्या अनेक जणांनी कोरोनाचे गांभीर्य माहीत असल्याने आपला होम किंवा संस्थात्मक क्वारंटाइनचा कालावधी चांगल्या प्रकारे पार पाडला आहे. त्यामुळे आता चिंता स्थानिक नागरिकांना करण्याची वेळ आली आहे. मी मुंबईला गेलो नसलो, तरी लॉकडाउन शिथिल झाल्याने मुंबईकर व अन्य ठिकाणांहून आलेले नागरिक अवतीभवती वावरत आहेत, याची जाणीव समाजात वावरताना ठेवावी, अशी अपेक्षा फलटण येथील जाणकार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या 81 इतकी झालेली आहे. त्यापैकी 47 जण बरे झाले असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सर्दी, खोकला, ताप यांसारखी लक्षणे दिसत असल्यास घरातच किमान सात ते आठ दिवस स्वतंत्र राहावे. जर बरे वाटत नसेल तर जवळच्या ग्रामीण रुग्णालय अथवा कोविड सेंटर येथे तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 


मास्कशिवाय वावरू नका 

सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय वावरू नये, सुरक्षित शारीरिक अंतर राखावे, सॅनिटायझरचा वापर करावा, कामाशिवाय शक्‍यतो बाहेर पडू नये, अशी काळजी घेतली तरी कोरोनापासून दूर राहणे सहज शक्‍य होणार आहे, असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

Gold Rate Today: सप्टेंबरअखेर सोनं 11 हजारांनी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात भाव किती?

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याने इमारतीवरून मारली उडी, प्रायव्हेट पार्ट कापलेला; वृंदावनात घटनेने खळबळ!

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT