karad 
सातारा

"या' शहरात "क्‍लीन अन्‌ ग्रीन सिटी' उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा) ः नगरपालिकेने "क्‍लीन व ग्रीन सिटी' उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील विविध मोकळ्या जागी पालिका वृक्ष लावणार आहे. त्या माध्यमातून शहरात अलीकडच्या काही दिवसांत किमान 100 वृक्षांचे रोपण केले आहे. कोरोनाविरोधात "मीच माझा रक्षक', डेंगी विरोधात "फाईट द बाईट'नंतर आता पर्यावरण संवर्धनासह शहरातील स्वच्छतेसाठी पालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी लवकरच वृक्ष प्राधिकरण समितीची बैठकही होणार आहे. 

कऱ्हाड पालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिला क्रमांक आला. त्यानंतर पालिकेने स्वच्छतेत सातत्य ठेवले आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळातही पालिका सतर्क आहे. पावसाळ्यात कऱ्हाडला डेंगीच्या रोगाची साथ पसरते, त्यासाठी पालिकेने "फाईट द बाईट'सारखा उपक्रम हाती घेतला आहे. त्यातून नागरिकांची जागृती केली जाणार आहे. त्याशिवाय कोरोनाच्या विरोधात "मीच माझा रक्षक अभियान' हाती घेतले आहे. त्या अंतर्गत नागरिकांना कोरोनाच्या विरोधातील लढ्यात सतर्कता कशी बाळगावी, याचे आरोग्य शिक्षण दिले जात आहे. या उपक्रमांबरोबरच पालिकेने "क्‍लीन व ग्रीन कऱ्हाड शहर' हाही उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी विशेष तयारी केली आहे. 

शहरात अनेक मोकळ्या जागा आहेत. त्या प्रत्येक जागेत वृक्षारोपण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पालिकेने त्याचा सर्व्हेही केला आहे. त्यानुसार एका प्रभागात किमान 100 रोपे लावण्यात येतील. त्यानुसार किमान तीन हजार रोपे लावण्यात येणार आहेत. लावण्यात येणारे वृक्ष किमान तीन वर्षांचे असेल. कारण, त्या वृक्षाचा वाढीचा वेग जास्त आहे. त्याची वाढही चांगली होते. त्यासाठी काही जागा निवडल्या आहेत. त्या माध्यातून त्या मोकळा जागी आता हिरवाई फुलणार आहे. 

ग्रीन सिटीसोबतच क्‍लीन सिटीची संकल्पना राबवली जात आहे. त्याचाही पालिकेने आराखडा तयार करून काम सुरू केले आहे. शहरातील रस्त्यांची, गटारांची सफाई दररोज होत आहे. त्याशिवाय काही मोकळ्या जागाही साफ करून घेण्यात येणार आहेत. पालिकेचे किमान 225 कर्मचारी त्यासाठी काम करणार आहेत. त्यामुळे स्वच्छ व हरीत कऱ्हाड शहर ही संकल्पना काही दिवसांतच येथे आकार घेईल. 

शहरात अनेक मोकळ्या जागा जेथे वृक्षारोपण करता येऊ शकते. त्याची पालिकेने पाहणी केली आहे. काही जागा स्वच्छ करून घेण्यात येतील. एका वॉर्डात किमान 100 वृक्ष लावण्यात येतील. वृक्षारोपणासोबत स्वच्छतेलाही प्राधान्य दिले जाईल. क्‍लीन व ग्रीन सिटी उपक्रमात नागरिकांनाही सहभागी करून घेण्याचे धोरण आहे. 

- यशवंत डांगे, मुख्याधिकारी, कऱ्हाड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT