सातारा

BigBreaking : सातारा जिल्ह्यात 17 जूलैपासून कडकडीत लाॅकडाऊन

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात 17 ते 26 जुलै दरम्यान कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी रात्रीच्या 12 पासून 26 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सातारा जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. ही परिस्थिती नियंत्रणात न आल्यास जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, अशी भावना विविध स्तरावर व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर येत्या गुरुवारी रात्रीपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात येण्याची शक्‍यता असल्याचेही सांगण्यात येत होते.

जुगारप्रकरणी पुण्यातील बारा जणांना वाईत अटक; 86 लाख 25 हजारांचा ऐवज जप्त 

दरम्यान, 17 जुलैपासूनचा लॉकडाउन कडक असणार आहे. यामध्ये त्या त्या परिस्थितीनुसार लॉकडाउन शिथील करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. 

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यांनतर कोरोनाचा प्रसार वाढत येत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सरकारच्या निर्देशानुसार कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सिंह यांनी केल्या आहेत. 

त्यांच्या गाडीत काेयता, विळा, दांडकी हाेती....त्यांनी तयारी केली....अन् पुढे काय झाले वाचा सविस्तर

दरम्यान लाॅकडाऊनच्या कालावधीत 22 जूलैनंतर शिथीलता देण्यात आलेली आहे. त्यानूसार 26 जूलैपर्यंत सकाळी नऊ ते दाेन वाजेपर्यंत केवळ अत्यावशक वस्तुंचा पूरवठा करणारी दूकाने व त्यांचे ठाेक विक्रेते यांची दुकाने सुरु राहतील. इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहीतल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT