Satara 
सातारा

वन्यप्राण्यांनी नुकसान केलेल्या पिकांची भरपाई मिळणार, मेढा कार्यालयात संपर्काचे आवाहन

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : परिसरातील वन्यप्राण्यांनी खाऊन फस्त केलेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही जावळी वनविभागाचे वनक्षेत्रपाल ए. ए. परदेशी यांनी दिली. 

केळघर परिसरातील केळघर, कुरळोशी, आंबेघर, डांगरेघर, वरोशी येथील भुईमूग, बटाटा ही पिके वन्यप्राण्यांनी खाऊन फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतचे वृत्त गुरुवारी (ता. तीन) दैनिक "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन वनविभागाने नुकसानीत शेतकऱ्यांचा पंचनामा करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीत क्षेत्राचा सातबारा उतारा व इतर आवश्‍यक कागदपत्रे घेऊन वन विभागाच्या मेढा येथील कार्यालयात संपर्क साधावा. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान वन्यप्राण्यांनी केले आहे. त्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी वनविभाग करणार असून, शेतकऱ्यांना जास्तीतजास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वनक्षेत्रपाल परदेशी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

फुलोऱ्यात आलेली पिके रानडुकरे व वानरांच्या कळपाने फस्त केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले होते. वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले होते. याबाबत "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्याने नुकसानीत शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळणार असून, नुकसान भरपाई ज्या पटीत नुकसान झाले आहे, त्या पटीत देऊन वनविभागाने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे. 

""केळघर परिसरात वन्यप्राण्यांनी शेतीचे मोठे नुकसान केले असून, या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वनविभागाने प्रयत्न करावेत. या विषयी वनविभागास सूचना करण्यात येईल.'' 
- शरद पाटील, तहसीलदार, जावळी 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT