Satara 
सातारा

जंगलवाडी घाटात वर्षाने अखेर भरावावर संरक्षक भिंतीची उभारणी!

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे  (जि. सातारा) :  "सकाळ'ने वृत्त प्रकाशित करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने गतवर्षी अतिवृष्टीत तारळे-जंगलवाडी घाटमार्गात वाहून गेलेल्या भरावालगत सरंक्षक भिंत बांधून धोका हटविल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून "सकाळ'ला धन्यवाद दिले. 

गतवर्षी अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्‍यात हाहाकार उडाला होता. त्यात शेकडो घरांची पडझड झाली तर अनेक गावांत भूस्खलनाच्या घटना घडल्या. असाच प्रकार जंगलवाडी घाटात झाला होता. जंगलवाडी, फडतरवाडी व खडकवाडी या तीन डोंगरावरील गावांत सुमारे दीड ते दोन हजार लोकसंख्या वास्तव्यास आहे. घाटातील एके ठिकाणी डांबरालगतचा तब्बल 20 ते 25 फूट लांब व खोल भराव वाहून गेला. डांबरी रस्त्याकडेचा सर्वच भराव वाहून गेल्यामुळे येथील वाहतूक धोकादायक बनली होती. त्यास वर्ष उलटले तरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले होते. संबंधित ठिकाणी कसलीही डागडुजी केली नाही. त्यामुळे तीन गावे संपर्कहीन होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली होती. 

गत 20 दिवसांपूर्वी "सकाळ'ने पावसाळ्यात तीन वाड्या संपर्कहीन होण्याचा धोका या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यास जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने प्रतिसाद देत तातडीने त्याठिकाणी सरंक्षक भिंतीचे काम हाती घेऊन पूर्ण केले. यामुळे येथील धोका दूर झाला असून, ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, समाधान व्यक्त केले आहे. शिवाय "सकाळ'ला व बांधकाम विभागाला धन्यवाद दिले. 


""पावसाळ्यात हा मार्ग बंद होण्याची शक्‍यता होती. "सकाळ'ने यावर लक्ष वेधले असता बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही केली, त्याबद्दल दोघांचे आभार.'' 

-अभिजित पाटील, 
संचालक, शिवदौलत बॅंक 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

Eknath Shinde: महाराष्ट्रात शिंदेसेनेचा मोठा धमाका! ३ कॅबिनेट मंत्र्यांवर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या बदलांनी राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT