Satara 
सातारा

गोंदवल्यात "कोरोना'तही रंगला दिंडी सोहळा; कायद्याच्या चौकटीत मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा

गोंदवले (जि. सातारा) : नेहमीप्रमाणे टाळांची किणकिण, मृदंगावर थाप अन्‌ मुखी श्रीरामाच्या जयघोषाने वातावरण मंगलमय झालेले होते. वारकऱ्यांची कमी असली, तरी उत्साह मात्र शिगेला पोचलेला होता. परंपरेनुसार श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायी दिंडीचे आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रस्थान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायद्याच्या चौकटीत निघालेल्या आषाढी वारी पायी दिंडी मिरवणुकीची सांगता मंदिरातच करण्यात आली. 

श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे कुलदैवत पंढरपूरचे विठ्ठल रुक्‍मिणी असल्याने गोंदवलेकर पायी दिंडीला विशेष महत्त्व आहे. पूर्वजांची वारीची परंपरा श्री महाराजांनीही सुरू ठेवली होती. "श्रीं'च्या पश्‍चात समाधी मंदिर समिती, वारकरी मंडळ व ग्रामस्थांनी हा सोहळा अविरतपणे सुरू ठेवला आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिकस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. गोंदवल्यातील "श्रीं'चे समाधी मंदिरदेखील अद्याप बंदच आहे. या पार्श्वभूमीवर पायी आषाढी वारीचा प्रश्न निर्माण झाला होता; परंतु शासनाच्या नियमांचे पालन करत या दिंडीचे प्रस्थान मोजक्‍या भाविकांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन मंदिर समिती व वारकरी मंडळाने केले होते. त्यानुसार आज सकाळी आठ वाजता समाधी मंदिरात "श्रीं'च्या पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली.

"श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक...'चा जयघोष घुमला अन्‌ मृदंगाच्या थापेबरोबरच टाळांचा गजर सुरू झाला. पताकाधारी वारकऱ्यांच्या मागे पायी दिंडीने मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी प्रस्थान ठेवले. हा पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात गावातील अप्पा महाराज समाधी, दत्त, शनी, खंडोबा, सिद्धनाथ, मारुती, श्रीराम मंदिरात विसावला. आरती व भजन झाल्यावर पुन्हा ही दिंडी गावाच्या वेशीपर्यंत नेऊन आरती करण्यात आली. त्यानंतर हा सोहळा पुन्हा समाधी मंदिरात आणून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. 


एकादशीपर्यंत होणार पादुकांची पूजा 

दरम्यान, आज प्रातिनिधिक स्वरूपात "श्रीं'च्या पायी दिंडीचे प्रस्थान झाले; परंतु "श्रीं'च्या पादुका समाधी मंदिरातील एका कक्षात विराजमान करण्यात आल्या असून, आषाढी एकादशीपर्यंत याच ठिकाणी पादुकांची पूजा करण्यात येणार आहे. शासनाने परवानगी दिल्यास एकादशी दिवशी काही भाविक या पादुका पंढरपुरात घेऊन जाणार असल्याची माहिती वारकरी मंडळाने दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT