फसवणूक sakal
सातारा

सातारा : मदत मिळवून देण्याच्या बहाण्‍याने फसवणूक; एकावर गुन्‍हा

कोरोनामुळे मृत झालेल्‍यांच्‍या वारसांना मदत मिळवून देण्‍याच्‍या बहाण्‍याने १३ हजार रुपयांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनामुळे मृत झालेल्‍यांच्‍या वारसांना मदत मिळवून देण्‍याच्‍या बहाण्‍याने १३ हजार रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात मकरंद वाघ (पुर्ण नाव पत्ता नाही) याच्‍यावर फसवणूकीचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

अमोल संपतराव लोहार (रा. जुनी एमआयडीसी, सातारा) यांना नोव्‍हेंबर महिन्‍यात जिल्‍हा रुग्‍णालयात मकरंद वाघ हा भेटला होता. वाघ याने मी शासकीय नोकर असून, आमची १८ जणांनी टिम आहे. कोरोनामुळे मृत झालेल्‍यांच्‍या वारसांना आम्‍ही मदत मिळवून देत असून, त्‍यासाठी आम्‍ही सातारा आणि सांगली जिल्‍ह्‍यात कार्यरत आहोत. आम्‍ही मृतांची कागदपत्रे जमा करत त्‍याव्‍दारे अडीच ते तीन लाख रुपये मदत मिळवून देत असून त्‍यासाठी काही कागदपत्रे लागतात. वाघवर विश्‍‍वास ठेवत लोहार यांनी कागदपत्रे आणि ४३० रुपये दिले. यानंतर वाघने मदत मंजूर करुन दिल्‍याबद्दल मिळणाऱ्या रक्कमेपैकी २ टक्के रक्कम आम्‍हाला द्यावी लागेल, असे लोहार यांना सांगितले.

याचदरम्‍यान वाघने आणखी काही काही जणांना मदत मंजूर झाल्‍याचे सांगत ५ ते १० हजार रुपये पर्यंतच्‍या रक्कमा घेवून काल जिल्‍हा परिषदेजवळ बोलावले होते. याठिकाणी वाघचा संशय आल्‍याने काही नागरीकांनी त्‍यास ताब्‍यात घेत सातारा शहर पोलिस ठाण्‍यात आणले. याप्रकरणी लोहार यांनी नोंदविलेल्‍या फिर्यादीनुसार वाघ याच्‍यावर २८ जणांची १३ हजारांची फसवणूक केल्‍याचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याचा तपास हवालदार जाधव हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT