सातारा

धाेका वाढला : कटापूर, वाहगाव, काटवली, कोळकीकरांनी काळजी घ्यावी

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यात मंगळवारी (ता.दाेन) रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार कोरेगाव तालुक्यातील कटापूर येथील 62 वर्षीय पुरुष, 24 व 55 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील वाहगाव येथील 34 वर्षीय पुरुष, काटवली येथील 29 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील वावदरे येथील 45 वर्षीय महिला, मुळचा माजगाव मात्र थेट कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असणारा 35 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील 2 वर्षीय बालक, दिवशी मारुली येथील 29 वर्षीय पुरुष, नवसारी येथील 55 वर्षीय सारी आजाराचा पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 55 वर्षीय महिला, माण तालुक्यातील दहिवडी येथील 19 वर्षीय युवक, कराड तालुक्यातील तुळसण येथील 62 वर्षीय सारी आजाराचा पुरुष, फलटण तालुक्यातील कोळकी येथील 54 वर्षीय सारी आजाराचा पुरुष, असे एकूण 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान भोगाव ता. वाई येथील 85 वर्षीय महिला, गिरवी ता. फलटण येथील 65 वर्षीय महिलेचा व वेळेकामती ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुषाचा मृत्यु पश्चात घेण्यात आलेला नमुना निगेटिव्ह आला आहे. तसेच कोळकी येथील एका कोरोना बाधिताचा मृत्यु आणि फलटण तालुक्यातील कोळकी येथे मुंबईवरुन प्रवास करुन आलेला 54 वर्षीय कोरोना बाधितचा मृत्यु झाला आहे. 

सातारा जिल्ह्यातील 208 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा डॉ. गडीकर यांनी कळविले आहे. दरम्यान मुंबई येथे खासगी प्रयोगशाळेत तपासणी करुन आलेल्या दिवड ता. माण येथील 29 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांना क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दाखल करुन उपचार सुरु आहेत.

हाेशियार... महाबळेश्वर, पाचगणीत सर्वाधिक पाऊस धडकला; वादळचाही धाेका
पुढच्या चार तासात सातारा जिल्ह्यात 50 ते 60  किमी या वेगाने वादळ सुटेल.. जिल्हावासियांनी काळजी घ्यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'कॉकरोच जनता पार्टी'ची पाकिस्तानात क्रेझ! पाकमध्येही 'कॉकरोच पार्टी', देशाच्या गृहमंत्र्यानेच सरकारला दिला 'हा' इशारा

Deglur Accident: देगलूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; आयशरच्या धडकेत तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

Pune Drugs Crackdown: पुणे पोलिसांचा ड्रग्ज तस्करांना दणका! 162 गुन्हे, 283 आरोपी अटकेत; 11.28 कोटींचा मुद्देमाल जप्त

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

SCROLL FOR NEXT