सातारा

दूरावलेले लेकरू पाच दिवसांनी आईच्या कुशीत

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कोरोना बाधीत झाल्यानंतर उपचार घेत असताना म्हासोली येथील गर्भवती महिलेची चारच दिवसात प्रसूती झाली. सुदैवाने जन्मलेल्या बाळाचा स्वॅबची तपसणी केली असता निगेटिव्ह आला. शनिवारी (ता. सहा जून) संबंधित महिला कोरोनामुक्त झाली. जन्मानंतर दूर ठेवलेल्या बाळाची तब्बल पाच दिवसांनंतर आईच्या कुशीत भेट झाली. यावेळी रुगणालय परिसरातील वातावरण भारावून गेले होते. 

कराड तालुक्यातील वनावासमाची, मलकापूर पाठोपाठ म्हासोलीत कोरोनाची साखळी निर्माण झाली. त्यात तेथील एका 27 वर्षीय गर्भवती महिलेचा 24 मे रोजी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वजण अवाक झाले हाेते. 

येथील कृष्णा रूग्णालयात उपचार घेत असताना संबंधित महिलेचा दोन जूनला प्रसूती झाली. पॉझिटिव्ह महिलेची प्रसूती असल्याने हॉस्पिटलनेही तितकीच काळजी घेतली होती. यावेळे जन्मलेल्या बाळाचाही स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. सर्वांचे लक्ष त्याच्या अहवालाकडे होते. सुदैवाने अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा श्‍वास घेतला. त्यानंतर जन्मलेले बाळ आईपासून दूर ठेवले होते. आईपासून दुरावलेल्या बाळाची भेट केव्हा होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती.

दरम्यान, संबंधित महिलेचा उपचारादरम्यान घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठवल्यावर तो निगेटिव्ह आला. येथील कृष्णा व सह्याद्री हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त झालेल्या 35 रूग्णांना दिलेल्या डिस्चार्जमध्ये म्हासोली येथील त्या महिलेचाही समावेश आहे. यावेळी कृष्‍णा रुग्णालयाच्या प्रांगणात कोरोनामुक्त झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी संबंधित महिलेचा सत्कारापेक्षा जन्म दिलेल्या बाळाला पाहून गहिवरून आले होते. जन्म झालेल्या बाळाला पाच दिवसांनी  दूरवलेले लेकरू आईने कुशीत घेताच सर्वांचे मन हेलावून गेले.

व्वा... पवारांनी दाखवली शेतीत पॉवर 

रामाचे ते वाक्‍य संसारसार सांगणारे... 

पर्जन्‍य राजाचा दरबार... 

अँग्री यंग मॅन... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT