सातारा

धडाका : कऱ्हाड, साताऱ्यात कोरोनामुक्तीचा अन् जावळीत बाधितांचा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांना बरे करण्यात आरोग्य विभागाला चांगलेच यश येत आहे. मंगळवारी (ता.3) दिवसभरात विविध रुग्णालयांतून 23 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.  

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे; परंतु त्याच तुलनेत रुग्ण बरे करण्याची किमयाही आरोग्य विभाग साधत आहे. (ता. 2) एकाच दिवशी 40 जण कोरोनामुक्त झाले. एकूण 23 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामध्ये कृष्णा हॉस्पिटलमधील 11, खावली क्वारंटाइन सेंटरमधील आठ व रायगाव सेंटरमधील चार जणांचा समावेश आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून बरे झालेल्यांत कऱ्हाड तालुक्‍यातील खालकरवाडी (चरेगाव) येथील 25 वर्षीय युवक, इंदोलीतील 37 वर्षीय महिला, 12 व 14 वर्षीय मुली, म्हासोलीमधील 55, 30, 55 वर्षीय महिला व नऊ वर्षीय मुलगा, पाटण तालुक्‍यातील शिराळमधील 25 वर्षीय युवक, खालेतील 21 वर्षीय महिला, बनपुरीमधील 16 वर्षीय युवकाचा समावेश आहे. कोरोना संशयितांना ठेवण्यासाठी खावली (ता. सातारा) येथे कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी कोरोना बाधितांवर उपचारही केले जातात. त्यातील आठ जणांना सोडण्यात आले. त्यामध्ये खटाव तालुक्‍यातील गादेवाडीतील पुरुष व दोन महिला, मांजरवाडीतील महिला, सातारा तालुक्‍यातील कुस खुर्दमधील पुरुष व दोन महिला, कोरेगाव तालुक्‍यातील फलेवाडीमधील महिलेचा समावेश आहे. रायगाव सेंटरमधून सोडलेल्यांमध्ये सातारा शहरातील प्रतापगंज पेठेतील 42 व 44 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्‍यातील कुमठे येथील 32 वर्षीय पुरुष व चंचळीतील 29 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
 
दरम्यान, साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या अंधोरी (ता. खंडाळा) येथील 43 वर्षीय (सारीचा रुग्ण) कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. मुंबईवरून प्रवास करून आलेल्या रांजणीतील (ता. जावळी) 85 वर्षीय महिलेचा मृत्यू पश्‍चात अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. हडपसर-पुणे येथून प्रवास करून आलेला 27 वर्षीय पुरुष व मुंबई येथून प्रवास करून आलेला वेळेकामथी (ता. सातारा) येथील 59 वर्षीय पुरुषाचा मृत्यूप्रश्‍चात नमुना तपासणीकरिता पाठविण्यात आला आहे.

जावळीत तीन नवे कंटेनमेंट झोन
 

जावळी तालुक्‍यामध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्या गावांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्याबाबत तहसीलदार व आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार त्यांनी जावळी तालुक्‍यातील कावडी, मुनावळेअंतर्गत काळकोशी वस्ती हे तीन नवीन कंटेनमेंट (प्रतिबंधित) झोन तयार केले आहेत.

वीज मीटर रिडींगच्या फोटोला ग्राहकांचा खो

धाेका वाढला : कटापूर, वाहगाव, काटवली, कोळकीकरांनी काळजी घ्यावी

हाेशियार... महाबळेश्वर, पाचगणीत सर्वाधिक पाऊस धडकला; वादळचाही धाेका
पुढच्या चार तासात सातारा जिल्ह्यात 50 ते 60  किमी या वेगाने वादळ सुटेल.. जिल्हावासियांनी काळजी घ्यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026: नेपाळ-ओमान वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार! १९ संघ ठरले, आता उरली एक जागा

Chhattisgarh Naxalite Surrender : छत्तीसगडमध्ये टॉप लीडरसह तब्बल १०० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण?

Crime News: आधी १० श्वानांवर विषप्रयोग, नंतर ४ लोकांना संपवलं, दोन बहिणीच्या क्रूर कृत्यामागचं कारण ऐकून शहर हादरलं!

Ambegaon News : टाव्हरेवाडीत विषबाधेने १५ मेंढ्यांचा मृत्यू,, पशुवैद्यकांनी १५ मेंढ्या वाचवल्या

Latest Marathi News Live Update : अंत्यविधी कार्यक्रमात पिकअप घुसला; एक मयत, एक गंभीर

SCROLL FOR NEXT