crime Esakal
सातारा

Satara Crime : आंधळीत डबल मर्डर; चुलत भाऊ-भावजयचा निर्घृण खून संशयितास अटक

double murder: रात्री अकराच्या सुमारास संजय व बापूराव यांच्यात पूर्ववैमनस्यातून वादावादी झाली.

सकाळ वृत्तसेवा

दहिवडी - आंधळी (ता. माण) येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून एकाने चुलत भाऊ व भावजयीचा निर्घृण खून केला. संजय रामचंद्र पवार (वय ५०) व मनीषा संजय पवार (वय ४५) असे खून झालेल्या दांपत्याचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी माहिती मिळाल्यापासून चार तासांत संशयितास अटक केली असून, बापूराव शहाजी पवार (वय ३५) असे त्याचे नाव आहे. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आंधळी (ता. माण) येथील संजय पवार व मनीषा पवार हे दांपत्य येथील पवार दरा येथे शनिवारी रात्री शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत संजय यांचा चुलत भाऊ बापूराव शहाजी पवार हासुद्धा गेला होता.

रात्री अकराच्या सुमारास संजय व बापूराव यांच्यात पूर्ववैमनस्यातून वादावादी झाली. त्या रागातून बापूराव याने सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने संजय यांच्या डोक्यावर, मानेवर, गळ्यावर वार केले. यावेळी पतीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या मनीषा यांच्यावरही बापूराव याने कुऱ्हाडीने जीवघेणे वार केले. दोघांनाही वर्मी घाव बसल्याने या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळावरून बापूराव पळून गेला.

सकाळी परिसरातील शेतकरी या शिवारात आले असता त्यांना संजय आणि मनीषा या दांपत्याचे रक्ताळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले. या खुनाची माहिती पोलिस पाटील यांनी दहिवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना दिली.

माहिती मिळताच घटनास्थळी तत्काळ पोलिस पथक दाखल झाले, तसेच स्थानिक गुन्हे शाखा, फॉरेन्सिक टीम व श्‍वान पथकाला पाचारण केले. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अश्‍विनी शेंडगे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक गुन्हे शाखा व दहिवडी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. गोपनीय सूत्रांकडून संशयित बापूराव पवार हा रात्री फलटणला पळून गेला होता. मात्र, आज परत याच शिवारात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शोध घेतला असता संशयित स्वतःच्याच चारचाकी गाडीत लपून बसलेला आढळून आला.

त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सदर घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने आंधळी परिसर सुन्न झाला असून, चूक कोणाची व शिक्षा कोणाला? तसेच व्यसनामुळे दोन संसार उद्‌ध्वस्त झाल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT