Pune Crime: लोखंडी रॉडने केला डोक्यात वार, हडपसर खूनाने हदरला  Pune Crime:
सातारा

Satara Crime: खड्ड्यातील पाणी अंगावर उडाल्याचा आला राग, चौघांनी केली लोखंडी रॉडने मारहाण

त्या वेळी सिकंदर शब्बीर शेख, सोहेल बशीर शेख व अकीब बशीर शेख (सर्व रा. सातारारोड) हे घराबाहेर आले.

सकाळ वृत्तसेवा

Koregaon: सातारारोड (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत मोटारसायकलवरून जाताना एका खड्ड्यातील पाणी अंगावर उडाल्याच्या कारणावरून एकास लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौघांवर कोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत निरंजन रणजित फाळके (वय २२, रा. फाळके चाळ, सातारारोड, ता. कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले की, काल रात्री पावणेनऊच्या सुमारास मी व माझा गावातील मित्र मंथन रत्नाकर सुतार असे दोघे मोटारसायकलवरून निघालो होतो. वालचंदनगर गेटसमोरील रोडने मोतीचंदनगर कॉलनीत जाताना माझी गाडी खड्ड्यातून गेल्याने खड्ड्यातील पाणी रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या दोघांच्या अंगावर उडाले. अंगावर पाणी उडाल्याने त्या दोघांपैकी सिकंदर शेख यांचा एक कामगार मला शिव्या देऊन पळून गेला. मी त्याच्यामागे पळत जाऊन सिकंदर शेख यांच्या घरासमोर जाऊन त्या कामगाराशी बोलत होतो. त्या वेळी सिकंदर शब्बीर शेख, सोहेल बशीर शेख व अकीब बशीर शेख (सर्व रा. सातारारोड) हे घराबाहेर आले.

त्यातील सोहेलने तेथे पडलेला लोखंडी गजाने माझ्या डोक्यात मारून मला गंभीर जखमी केले, सिकंदर व अकीब यांनी मला हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माझा मित्र मंथन सुतार हा मला सोडवण्यास आला असता त्यालासुद्धा सोहेलने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणून माझी सिकंदर शेख, सोहेल शेख, अकीब शेख व सिकंदर शेखचा एका कामगाराविरोधात तक्रार आहे. हवालदार साळुंखे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT