सातारा

फलटण-पंढरपूर मार्गावर टेंपोच्या धडकेत गरगडेचा युवक ठार

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण-पंढरपूर मार्गावर विडणी गावच्या हद्दीत टेंपोने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचालक ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सुहास मारुती गरगडे (वय 22, रा. गरगडे वस्ती गुणवरे, ता. फलटण) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. 

सुहास गरगडे व त्याचा चुलत भाऊ सौरभ हणमंत गरगडे हे फलटणहून कारने गुणवरे येथे निघाले होते. सुहास हा कार चालवित होता. कार विडणीच्या हद्दीत आली असता फलटणकडे वेगाने निघालेल्या टेंपोने धडक दिली. यामध्ये सुहास गरगडे याचा मृत्यू झाला, तर त्याच्या समवेत कारमध्ये असलेला त्याचा भाऊ सौरभ गरगडे (वय 21) हा गंभीर जखमी झाला. काल सकाळी पावणेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. 

टेंपोचालक मारुती विठ्ठल कोडग (वय 40, रा. आवंडी ता. जत, जि. सांगली) याला घटनास्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात मृत्यूस व गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या अपघाताचा तपास पोलिस हवालदार डी. डी. कदम करीत आहेत. दरम्यान, सुहास गरगडे याच्यावर गुणवरे येथे रात्री आठच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT