Satara Latest Marathi News 
सातारा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग; बर्थडे बॉयसह साताऱ्यात 15 जणांवर गुन्हा

गिरीश चव्हाण

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करत गोडोली येथील जिजामाता उद्यानाजवळ रात्री वाढदिवस साजरा करणाऱ्या 15 युवकांवर काल सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त केलेल्या सात दुचाकी क्रमांकांच्या आधारे पोलिस त्या युवकांचा शोध घेत आहेत. 

कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे काल रात्री आठपासून संचार आणि जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सातारा शहर पोलिस ठाण्याचे गस्तीपथक काल गस्तीवर होते. त्यांना गोडोली येथील जिजामाता उद्यानाजवळ रात्री साडेआठच्या सुमारास 15 युवक दुचाक्‍यांवरून थांबल्याचे दिसले. हे युवक एकाचा वाढदिवस केक कापून साजरा करत होते. 

पोलिस आल्याचे पाहून त्याठिकाणी असणाऱ्या युवकांनी दुचाकी जागीच सोडून पळ काढला. त्या दुचाक्‍या नंतर पोलिसांनी ताब्यात घेत सातारा शहर पोलिस ठाण्यात आणल्या. या दुचाक्‍यांच्या क्रमांकावरून पोलिसांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेल्या युवकांचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी गणेश ताटे यांनी फिर्याद नोंदवली असून, हवालदार कारळे हे तपास करीत आहेत.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT