Satara Latest Marathi News 
सातारा

नरवणेत वाळूच्या वादातून दोघांचा कुऱ्हाडीने खून; दहिवडीत आठ जणांना पोलिस कोठडी

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि. सातारा) : नरवणे (ता. माण) येथे झालेल्या दुहेरी खुनातील आठ संशयित सध्या पोलिसांच्या हाती लागले असून, न्यायालयाने त्यांना मंगळवार (ता. 23) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गावात आजही तणावपूर्ण शांततेचे वातावरण दिसत आहे. 

वाळूच्या कारणावरून नरवणे येथे बुधवारी (ता. 17) सकाळी दोन गटांत मारामारी झाली होती. चंद्रकांत नाथजी जाधव यांच्या घरात कुऱ्हाड व इतर हत्यारांनी झालेल्या या मारामारीत चंद्रकांत यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर विलास धोंडिबा जाधव यांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला होता. सात जण जखमी झाले होते. या घटनेनंतर दोन्हीही गटाकडून दहिवडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी खुनाच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या.

या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून बुधवारी रात्री पाच जणांना अटक केली होती. यामध्ये सूर्यकांत नाथजी जाधव, कृष्णा प्रकाश तुपे, कृष्णा धोंडिबा जाधव, सागर शिवाजी जाधव व शिवाजी धोंडिबा जाधव यांना अटक करण्यात आली होती. या सर्वांनी न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. सत्यवान धोंडिबा जाधव, जीवन शिवाजी जाधव, समीर कृष्णा जाधव या तिघांना दहिवडी पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांनाही येत्या मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

मांढरदेव घाटात बोरवेलच्या गाडीतून पडून मध्य प्रदेशच्या युवकाचा मृत्यू

दरम्यान, या प्रकरणात जखमी झालेल्या विश्वास जाधव याच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात, तर विशाल जाधव पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील आणखी काही संशयितांच्या मागावर पोलिस आहेत. पोलिस उपअधीक्षक नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ व प्रमोद दीक्षित अधिक तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT