Satara Latest Marathi News 
सातारा

'तू मोठा भाई झालायस, तुला खूप मस्ती आलीय'; वाईत पूर्ववैमनस्यातून एकावर धारधार शस्त्राने वार

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : येथील औद्योगिक वसाहतीतील चांदणी चौकात काल (ता.15) रात्री साडेनऊच्या दरम्यान किरकोळ कारणावरून व पूर्ववैमनस्यातून रविवार पेठेतील एकावर धारधार शस्त्राने वार करण्यात आले. अक्षय नंदकुमार निकम (वय 25, रा. सर्वानंदनगर, पेटकर कॉलनी, रविवार पेठ, वाई) असे या घटनेतील जखमीचे नाव आहे. 

अक्षय आणि त्याचा मित्र धीरज दगडे हे दोघे वाई औद्योगिक वसाहत येथील चांदणी चौकातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी बोपर्डी येथील अमन शेख, संग्राम शिर्के, ऋतिक गाढवे या तिघा संशयितांनी अक्षयला "तू मोठा भाई झाला आहेस, तुला खूप मस्ती आली आहे. आता याची मस्ती पुरेपूर जिरवूया,' असे म्हणत त्याला व त्याचा मित्र धीरज दगडे याला हाताने व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

या वेळी अक्षयवर धारदार शस्त्राने डोक्‍यावर, डाव्या खांद्यावर व गुडघ्यावर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे करत आहेत. एक वर्षांपूर्वी रविवार पेठेत झालेल्या टोळीयुद्धात अक्षय व धीरज या दोघांचा सहभाग होता. यामुळे वाईत पुन्हा टोळीयुद्ध डोके वर काढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT