Satara Latest Marathi News 
सातारा

नागनाथवाडीत बैलगाडी शर्यतप्रकरणी खटाव-कोरेगावातील 6 जण ताब्यात; स्थानिक गुन्हे अन्वेषणची धडक कारवाई

सलीम आत्तार

पुसेगाव (जि. सातारा) : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत नागनाथवाडी येथील बेकायदेशीर बैलगाडी शर्यती घेणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून शर्यतीसाठी वापरलेला 5 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पुसेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक लोंढे, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना काल सकाळी साडेनऊच्या सुमारास नागनाथवाडी येथे सकाळी साडेनऊच्या सुमारास बैलगाडीची शर्यत लावणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, स्थानिक गुन्हे शाखा व पुसेगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी खासगी वाहनाने तेथे जाऊन सापळा रचला असता तेथील उपस्थित सात ते आठ बैलगाडी चालक हे बैलगाड्या जुंपून बैलांना चाबकाने मारहाण करत बैलांना निर्दयतेने वागवून बैलगाडी शर्यत घेत असल्याचे निदर्शनास आले. या वेळी उपस्थित असलेले इतर अनोळखी लोक हे शर्यतीस प्रोत्साहन देत होते; परंतु शर्यतीत भाग घेण्यासाठी आलेल्या काही लोकांना पोलिसांचा सुगावा लागल्याने जुंपलेल्या बैलांना सोडवून काही जणांनी पळ काढला. या वेळी त्यातील चार बैलगाड्या, चार बैल व शर्यतीच्या संयोजकांना ताब्यात घेण्यात आले. 

या वेळी प्रताप अनिल घाडगे, अनिकेत धनाजी घाडगे, अमर जगदीश घाडगे, मारुती शामराव चव्हाण, रवींद्र ज्ञानदेव फाळके (सर्व रा. ललगुण, ता. खटाव), तसेच शिवाजी शंकर जगदाळे (रा. कवडेवाडी, ता. कोरेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. या शर्यतीचे संयोजक प्रताप अनिल घाडगे यांच्याकडे तीन सिल्वर रंगाच्या धातूच्या गदा, मोबाईल व रोख रक्कम, तसेच अनिकेत घाडगे, अमर घाडगे, मारुती चव्हाण, शिवाजी जगदाळे यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम, तसेच एक पांढऱ्या रंगाचा बैल, पळून गेलेल्यांच्या मोटारसायकली, शर्यतीचे छकडे असा एकूण पाच लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिस शिपाई इम्तियाज सलिम मुल्ला यांनी फिर्याद दिली. या कारवाईत हवालदार साबळे, पवार, नाचण, ननावरे, शिरतोडे, शिंदे, एस. आर. माने यांनी सहभाग घेतला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्चे तेल 100 डॉलर पार! देशात नवे इंधन दर जाहीर; तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर किती?

Thackeray Brothers on Student Protest: विद्यार्थी आंदोलनाने ठाकरे बंधू एकवटले; आंदोलकांच्या पाठिंब्यासाठी ठाकरेंची दुसरी पिढी मैदानात

Latest Marathi News Live Update : पुण्यातील खडकवासला धरण 100 टक्के भरले; 4800 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू

Godavari River Floods Nashik : नाशिक पुराच्या विळख्यात! दुतोंड्या मारुती पाण्याखाली, गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदाकाठावर हायअलर्ट, पाहा स्थिती

NEET UG Paper Leak: ज्याला मानलं जात होतं पेपरफुटीचा 'मुख्य सूत्रधार', त्यालाच CBI ची क्लीन चिट; चार्जशीटमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT