Satara Latest Marathi News 
सातारा

नागठाणेच्या चोरट्याचा पोलिसांनी उतरवला 'मास्क'; पुण्यात किंमती दुचाकींची चोरी करणारा अटकेत

सुनील शेडगे

नागठाणे जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र मास्क तपासणी सुरु आहे. पोलिस कसून तपासणी करत आहेत. मात्र, याला अपवाद ठरला आहे चोरटा. निमित्त झाले मास्क तपासणीचे. मात्र, त्यातून पुण्यात किमती दुचाकी चोरणारा युवक पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला असून त्याच्याकडून पोलिसांनी चार यामाहा एफझेड दुचाक्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यांच्या किमती साडे चार लाखांच्या घरात आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन दिनकर सुतार (वय 35, रा. नागठाणे, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. मालकाच्या परस्पर शोरूममधून नव्या कोऱ्या दुचाकी बाहेर काढून तो त्यांची विक्री करत असे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. बोरगाव पोलिस ठाण्याचे हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम, राजू शिखरे हे नागठाण्यातील चौकात विनामास्क फिरणाऱ्या लोकांची तपासणी करत होते. अशावेळी पोलिसांना क्रमांक नसलेली दुचाकी आढळली. या दुचाकीवर असलेल्या युवकाकडे नंबरप्लेटविषयी पोलिसांनी विचारणा केली. मात्र, संबधित युवकाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले. या वेळी त्याने पुण्यातील शोरूममधून नव्या कोऱ्या महागड्या दुचाकी चोरून त्यांची परस्पर विक्री केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याच्याकडून नागठाणे भागातून चार किंमती दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.

नितीन सुतार हा पुण्यातील वाकडेवाडी येथील शेलार यामाहा शोरूमच्या मालकाच्या गाडीवर चालक म्हणून काम करतो. मालकाने विश्वासाने त्याच्याकडे दुचाकीच्या गोडाऊनच्या चाव्या दिल्या होत्या. मात्र, त्याने लॉकडाऊन काळात येथून महागड्या दुचाकी बाहेर काढून परस्पर त्यांची विक्री केली. बोरगाव पोलिसांनी संशयावरून त्याला हटकल्यावर ही संपूर्ण घटना उघडकीस आली असून याची माहिती खडकी (पुणे) पोलिसांना देण्यात आली आहे. तेथे नितीन सुतार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला खडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल,अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही घटना उघडकीस आली.

पोलिसांची सतर्कता

नितीन याने प्रथम आपल्या मालकाचा विश्वास संपादन केला. त्यामुळे मालकाने नितीनला गोडावूनची चावी दिली. त्यामुळे त्याला मोकळे रान सापडले. मालकाच्या परस्पर तो किंमती गाड्या बाहेर काढून तो त्यांची विक्री करु लागला. मात्र, मनोहर सुर्वे, किरण निकम, राजू शिखरे यांच्या सतर्कतेमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळेतली पोरं...! डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानात शाहीन आफ्रिदीची उडवली खिल्ली; PSL च्या पत्रकार परिषदेत केला ना कल्ला... Video Viral

Hindu Muslim Unity : दुकानाला भीषण आग अन् आत शंकराची मूर्ती, धर्माच्या सीमा ओलांडून मुस्लिम तरुणांनी केलं धाडस, राज्यभरातून होतेय कौतुक

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत दुचाकी फक्त दोनशे, तर चार चाकी वाहनामध्ये दोन हजार रुपयांचे इंधन भरता येणार

Pune–Mumbai Expressway Traffic : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर निघालात? आधी हे वाचा, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

Kolhapur Fuel Limit : दुचाकीत 200 तर, चारचाकीत 2000 पर्यंतच मिळणार पेट्रोल; साठे बाजार करणाऱ्यांवर होणार कारवाई, बाटली-कॅनमधून दिल्यास दंड!

SCROLL FOR NEXT