Satara Latest Marathi News 
सातारा

..अखेर यवतेश्‍वरात सापडलेल्या मोबाईलवरुन मानवी सांगाड्याचे गुढ उलगडले

गिरीश चव्हाण

सातारा : यवतेश्‍वर (ता.सातारा) येथील एका शेतात आज दुपारी मानवी हाडांचा सांगाडा सापडला. याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना शोधादरम्यान त्याठिकाणी एक मोबाईल सापडला. या मोबाईलव्दारे तपास केला असता, मृत व्यक्‍ती मुनावळे (ता. सातारा) येथील असल्याचे समोर आले. याची प्राथमिक नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. 

सांबरवाडी (ता. सातारा) येथे हणमंत शंकर भोसले हे राहण्यास असून त्यांना आज गावातील काहीजणांनी यवतेश्‍वर येथील सपकाळ यांच्या तुतीचे शेताजवळ मानवी सांगडा असल्याची माहिती दिली. यानुसार भोसलेंनी त्याठिकाणी जावून पाहणी करत याची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. पाहणीत त्यांना मानवी कवटी तसेच हाडांचा संपूर्ण सांगाडा शेतातील झाडाझुडुपांत पडल्याचे दिसले. त्याठिकाणाची पाहणी दरम्यान पोलिसांना एक मोबाईल सापडला. हा मोबाईल मृताचाच असावा, या शक्‍यतेने त्यांनी त्याची तपासणी केली. मोबाईल कार्डचे तांत्रिक विश्‍लेषण केल्यानंतर काही नंबर पोलिसांना मिळाले. 

यानुसार पोलिसांनी त्यापैकी काही नंबरवर फोन करत माहिती घेतली. यावेळी सदर मोबाईल क्रमांक हा मुनावळे (ता. सातारा) येथील संतोष पांडुरंग भोसले (वय 37) याचा असल्याचे समोर आले. यानंतर त्याचे नातेवाईक त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी सापडलेला मोबाईल, नंबर, त्यातील सिमकार्ड गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून परागंदा झालेल्या संतोषचाच असल्याचे पोलिसांना सांगितले. संतोष हा व्यसनांच्या आहारी गेला होता. यामुळे त्याचा नेहमी कुटुंबाशी वाद व्हायचा. वारंवारच्या वादाला कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. पत्नी माहेरी निघून गेल्यापासून संतोष हा परागंदा झाला होता. सुमारे अडीच ते तीन महिन्यांपूर्वी संतोष याचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याची प्राथमिक नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली असून तपास उपनिरीक्षक मनोहर फरांदे हे करीत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT