Satara Latest Marathi News 
सातारा

वाळूच्या वादातून नरवणेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; दुहेरी खुनातील संशयितांच्या पोलिस कोठडीत वाढ

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि. सातारा) : नरवणे (ता. माण) येथे झालेल्या दुहेरी खुनातील तपास करण्यासाठी आठही संशयितांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने आज वाढ केली. पोलिसांच्या विनंतीवरून रविवार (ता. 28) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

वाळूच्या कारणावरून नरवणे येथे 17 रोजी सकाळी दोन गटांत तुंबळ मारामारी झाली होती. चंद्रकांत नाथजी जाधव यांच्या घरात कुऱ्हाड व इतर हत्यारांनी झालेल्या या मारामारीत चंद्रकांत यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर विलास धोंडिबा जाधव यांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला होता. काही जण जखमी झाले होते. या घटनेनंतर दोन्हीही गटांकडून दहिवडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी खुनाच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. 

या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेनंतर दोन दिवसांत सूर्यकांत नाथजी जाधव, कृष्णा प्रकाश तुपे, कृष्णा धोंडिबा जाधव, सागर शिवाजी जाधव, शिवाजी धोंडिबा जाधव, सत्यवान धोंडिबा जाधव, जीवन शिवाजी जाधव, समीर कृष्णा जाधव यांना अटक केली आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आजपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. 

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी आज या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले. तसेच या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन सखोल तपासासाठी पोलिस कोठडीत वाढ मिळावी, अशी विनंती या वेळी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने येत्या रविवार(ता.28)पर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ व प्रमोद दीक्षित करत आहेत.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नुसतं राहायचं ठिकाण नाही, सलमान खानच्या १५० एकरात असलेल्या फार्महाउसवर होते शेती; काय काय पिकतं माहितीये?

Pune News : शेतकऱ्यांच्या १२ कोटींच्या मोबदल्यावरून महापालिकेची नामुष्की; आयुक्तांची खुर्ची जप्तीची कारवाई टळली

PMC News : पुणे महापालिका भाडेतत्त्वावर घेणार २५० घंटागाड्या; कचरा संकलन व्यवस्था होणार अधिक सक्षम

Flood News : कोरेगाव मुळ बंधाऱ्यावरून दुचाकीसह ज्येष्ठ वाहून; एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू

Pune News : ‘आर्किटेक्ट’ पदवीचा बेकायदेशीर वापर महागात; कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा कठोर इशारा

SCROLL FOR NEXT