Satara Latest Marathi News Satara Crime News 
सातारा

धूम स्टाईल सोनसाखळी चोरट्यास कऱ्हाडात अटक

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : शहर व परिसरात धूम स्टाईल चेन स्नॅचिंग करणाऱ्या एकास शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. जयदीप सुनील पाटील (रा. सोनकिरे, ता. कडेगाव) असे त्याचे नाव आहे. त्याचा आणखी एक साथीदार आहे, त्याची माहिती पाटीलने दिली. पोलिस त्याच्या मागावर आहेत. शहर परिसरासह जिल्ह्यातील विविध भागांत त्यांनी चेन स्नॅचिंग केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहर व परिसरात होणाऱ्या चेन स्नॅचिंगचे गुन्हे होत होते. ते उघड व्हावेत, यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेने विशेष पथक तयार केले. ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह सहायक फौजदार राजेंद्र पुजारी, हवालदार सतीश जाधव, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, सचिन साळुंखे, तानाजी शिंदे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव त्या पथकात कार्यरत होते. पथक शहरात गस्त घालत होते. त्या वेळी त्यांना बातमीदाराकडून माहिती समजली. त्यामध्ये कडेगाव तालुक्‍यातील दोन संशयित भागात सोन साखळ्यांची चोरी करत आहेत, असेही समजले. त्यानुसार पोलिसांनी शहरातील विविध भागांत सापळा रचला. 

जयदीप पाटीलची ओळख पटली. त्याला पोलिसांनी कडेगाव तालुक्‍यातील सोनकिरे येथून अटक केली. त्याने साथीदाराच्या मदतीने मागील महिन्यात शेणोलीतील संजयनगर बस स्टॉपवर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची माहिती हाती आली. त्या वेळी त्यांनी दुचाकीवरून पलायन केले होते. त्याची कबुली त्यांनी दिली आहे. जयदीपकडून आणखी एकाचे नाव समजले आहे. त्याचीही खात्री करण्याचे काम सुरू असून, तालुका पोलिस त्याचा शोध घेत आहेत. जयदीपला पुढील कारवाईसाठी कऱ्हाड तालुका पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. त्यानुसार तालुका पोलिस तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंघोळीचा आनंद ठरला अखेरचा; वैनगंगा नदीत बुडून १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, तर दोघे थोडक्यात बचावले, मकरसंक्रांतीला दुर्दैवी घटना

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी पोलिसांचा बंदोबस्त; १४ हजार जवानांचा खडा पहारा!

Ration Card : रेशन बंद होऊन थेट १००० रुपये खात्यात येणार; सोशल मीडियावरील 'त्या' व्हायरल दाव्याचे वास्तव काय?

Yerwada Bus Accident : सिग्नलवर थांबला अन् काळाने झडप घातली; भरधाव बसने दुचाकीला चिरडले; येरवड्यात भीषण अपघात!

Pune Cyber Fraud : कर्वेनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाला ५.६३ लाखांचा चुना; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष!

SCROLL FOR NEXT