Satara Latest Marathi News Satara Crime News
Satara Latest Marathi News Satara Crime News 
सातारा

कर्जासाठी फसवणाऱ्या मार्डीतील युवकास अटक; मिरज पोलिसांची कामगिरी

प्रवीण जाधव

मिरज​ : बोगस कंपनीद्वारे कर्ज मिळवून देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करणाऱ्यास मिरज शहर पोलिसांनी केवळ 24 तासांत अटक केली. रमेश नाना निकम (वय 32, रा. मार्डी ता. माण) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून फसवणुकीची रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. 

मिरज शहर पोलिस ठाण्यातील संजय येवले या गुन्हा अन्वेषण शाखेतील पोलिस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे हा संशयित भामटा पोलिसांच्या हाती लागला. मिरज शहरातील बोलवाड रस्त्यावर सचिन नायकू बरगाले यांचे खत विक्रीचे दुकान आहे. त्याचा फोन नंबर घेऊन रमेश निकम याने त्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी व्यावसायिक स्वरूपात मदत करण्याचा प्रस्ताव दिला. त्यासाठी आपण लेंडिग मार्क या कंपनीची स्थापना केल्याचीही बतावणी केली.

बरगाले यांच्याशी सातत्याने संपर्क साधून व्यवसायासाठी रमेशने 14 लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना कमिशन द्यावे लागेल. ही रक्कम आपल्या मध्यस्थीनेच द्यावी लागेल, असे सांगून त्यासाठी निकमने स्वतःचा बॅंकेतील खाते नंबरही दिला. याच खात्यावर एक लाख आठ हजार 880 रुपयांची रक्कम स्वीकारली. हा सगळा व्यवहार करताना रमेशने वापरलेल्या मोबाईल नंबरच्या आधारे पोलिसांनी या ठकसेनास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख आठ हजार 880 रुपयांची रक्कम हस्तगत केली. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT