Satara Latest Marathi News Satara Crime News 
सातारा

पुसेगाव-फलटण मार्गावर खातगुणचा युवक ठार; पुलाच्या खड्ड्याने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

सलीम आत्तार

पुसेगाव (जि. सातारा) : पुसेगाव-फलटण मार्गावर येथील लेंढोरी ओढ्यावर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलालगत खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून सोमवारी (ता. 8) रात्री नऊच्या सुमारास खातगुण (ता. खटाव) येथील दुचाकीस्वार ठार झाला. बळीराम शिवराम यादव (वय 37) असे मृताचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच येथील युवकांनी बांधकाम बंद पाडले. 

दरम्यान, पुलाचे बांधकाम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली असून, संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी केली आहे. पुसेगाव-फलटण मार्गाचे काम सध्या सुरू असून, त्याअंतर्गत येथील छत्रपती शिवाजी चौकापासून काही अंतरावर असलेल्या लेंढोरी ओढ्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. या नवीन पुलालगत खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्यात पडल्याने बळीराम यादव यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पुसेगाव येथील संतप्त युवकांनी पुलाचे काम बंद पाडले. 

या वेळी शिवजयंती उत्सव समितीचे सूरज जाधव, सकल मराठा मोर्चाचे दीपक तोडकर, आकाश जाधव, अमित जाधव, दत्ता जाधव उपस्थित होते. दरम्यान, पुसेगाव-फलटण मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. या पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत बेजबाबदार असलेल्या ठेकेदारावर खातगुण येथील दुचाकीस्वाराच्या मृत्यूबद्दल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्चे तेल 100 डॉलर पार! देशात नवे इंधन दर जाहीर; तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर किती?

Thackeray Brothers on Student Protest: विद्यार्थी आंदोलनाने ठाकरे बंधू एकवटले; आंदोलकांच्या पाठिंब्यासाठी ठाकरेंची दुसरी पिढी मैदानात

Latest Marathi News Live Update : पुण्यातील खडकवासला धरण 100 टक्के भरले; 4800 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू

Godavari River Floods Nashik : नाशिक पुराच्या विळख्यात! दुतोंड्या मारुती पाण्याखाली, गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदाकाठावर हायअलर्ट, पाहा स्थिती

NEET UG Paper Leak: ज्याला मानलं जात होतं पेपरफुटीचा 'मुख्य सूत्रधार', त्यालाच CBI ची क्लीन चिट; चार्जशीटमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT