Satara Latest Marathi News Satara Crime News 
सातारा

शेअर मार्केटमधून कऱ्हाडातील युवकांना 20 लाखांचा गंडा; उत्तर प्रदेशातील एकाला अटक

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : शेअर मार्केटमधून कमी दिवसांत जादा टक्केवारीने पैसे परत देण्याचे आमिष दाखवून शहरातील युवकांना सुमारे 20 लाखांना गंडा घालणाऱ्या परप्रांतीय युवकास पोलिसांनी गजाआड केले. उत्तर प्रदेश येथील ग्रेटर नोयडा येथे सापळा रचून शहर पोलिसांच्या पथकाने त्यास पकडले आहे. हरिदयाळ रंजनदास गुप्ता (रा. सॉक्रेटिस थ्री, ओमिक्रॉन, ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश) असे अटक झालेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून तीन मोबाईल संचासह लॅपटॉप जप्त केला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील युवकांना शेअर मार्केटमधून कमी दिवसांत जादा टक्केवारीने पैसे परत देण्याचे आमिष दाखवून गुप्ता याने शहरातील युवकांकडून 19 लाख 87 हजार 500 रुपये रक्कम वेगवेगळ्या बॅंक खात्यावर मागवून घेतली. ती रक्कम परत न देता तो पसार झाला होता. त्याबाबत शहर पोलिसात फिर्याद दाखल होती. फसवणुकीचे गुन्हे उघड करण्यासाठी खास पथकाची नेमणूक केली होती. 

त्यानुसार पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर, हवालदार तानाजी शिंदे, प्रफुल्ल गाडे, मारुती लाटणे, विनोद माने आदींनी या गुन्ह्याचा तपास केला. काही तांत्रिक व महत्त्वाच्या माहितीच्या आधारावर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्यांनी माहिती जमा केली. त्यानुसार गुप्ताची माहिती हाती आली. त्याची खात्री झाल्याने त्यांनी दिल्ली व नोएडा भागात जाऊन तपास केला. त्यात त्याला अटक झाली. त्याच्याकडून तीन मोबाईल व एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT