Satara Latest Marathi News Satara Politics News 
सातारा

कऱ्हाडात गुंडांच्या टोळ्यांवर धडाकेबाज कारवाई; 'टोळ्यामुक्त'साठी पोलिसांचे अनोखे पाऊल

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : गुंडांच्या टोळीमुक्त कऱ्हाड शहर करण्यासाठी पोलिसांनी आराखडा तयार करून त्यासाठी पावले उचलली आहेत. शहरातील आणखी काही टोळ्यांवर तडीपारीसह अन्य कारवाया प्रस्तावित करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी गुंडांच्या टोळ्यांच्या कुंडली जमा केल्या आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांनी काल ही माहिती दिली. 

कऱ्हाडमध्ये वर्चस्ववादातून गुंडाच्या टोळ्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. शहरासह तालुक्‍यात सुमारे अकरा गुन्हेगारी टोळ्या असल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. काही टोळ्यांमधील गुन्हेगारी संपत आली आहे, तर अजूनही काही टोळ्या सक्रिय आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांकडून कारवाया सुरू आहेत. अलीकडे आकर्षणापोटी आणि भाई म्हणावे यासाठी महाविद्यालयीन तरुणही गुन्हेगारी टोळ्यांकडे वळत आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवायातून हे वास्तव समोर आले आहे. किरकोळ कारणावरून वर्चस्ववादातून टोळ्या तयार होतात आणि त्यातून सातत्याने मारामारी सुरू राहते.

मध्यंतरी शहरात टोळ्यांतील वर्चस्ववादातून खून, खुनी हल्ला, खंडणी, मारामारी अशा घटना घडल्या. त्यातून काही दिवस नागरिकांना वेठीस धरण्याचेही प्रकार घडले होते. त्यानंतर तत्कालीन पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव व सध्याचे उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी गुन्हेगारी टोळ्यांना टार्गेट केले. त्यातूनच मग काही दिवसांपूर्वी शहरातील सोळवंडे टोळी व शेख टोळीवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली, तर त्यानंतर आता अभिनंदन झेंडे टोळीला तडीपार करत गुन्हेगारी संपवण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. अजूनही काही टोळ्यांच्या तडीपारीसाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत. त्यासाठी पोलिसांनी संबंधितांची कुंडली जमा केली आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. गोडसे यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT