Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; दहा जण पोलिसांच्या ताब्यात

गिरीश चव्हाण

सातारा : शाहूपुरी पोलिसांनी मोळाचा ओढा परिसरात असणाऱ्या एका शेडवर छापा टाकत जुगार खेळणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांकडून पोलिसांनी 35 हजार रुपयांची रोकड व इतर साहित्य जप्त केले आहे. मोळाचा ओढा येथील आझादनगर परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती काल शाहूपुरी पोलिसांना मिळाली. यानुसार त्याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. 

याठिकाणाहून पोलिसांनी किरण रविंद्र तपासे ( वय 26, रा. मल्हार पेठ, सातारा), सागर शामराव चव्हाण (वय 31, रा. आदर्श कॉलनी, तामजाईनगर, करंजे), नितीन अनिल कुऱ्हाडे (वय 34, रा. एकता कॉलनी, करंजे), गोरक्षनाथ विनायक जाधव (वय 32, रा. दत्त मंदिरामागे, सैदापुर), धनाजी शंकर वाघमारे (वय 52, रा. एकता कॉलनी, करंजे), अनिल लक्ष्मण वाघमारे (वय 37, रा. 702, गुरुवार पेठ, सातारा), फिरोज खुदबुद्दीन झारी (वय 56, रा. श्रीनगरी, तामजाईनगर, करंजे), मुकद्दर सिराज मुलाणी (वय 35, रा. मज्जीद शेजारी, कोंडवे), सुनील नानु जाधव (वय 51, रा. दिव्यनगरी, कोंडवे), इब्राहिम यासीन शेख (वय 36, रा. विघ्नहर्ता कॉलनी, कोंडवे) यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांकडून 35 हजारांची रोकड व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT