Satara Latest Marathi News Satara Crime News 
सातारा

फलटणात मटका अड्ड्यांवरील छाप्यात दोघांना अटक; पोलिसांकडून मुद्देमालासह रोकड जप्त

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : दोन मटक्‍याच्या अड्ड्यांवर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात साडेसव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की बुधवारी (ता. 3) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाचबत्ती चौक येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या गाळ्यात अजय आनंद अहिवळे (वय 27, रा. मंगळवार पेठ, फलटण) हा पैशावर राजधानी व कल्याण नावाचा मटका स्वीकारताना आढळला तसेच त्याच्याकडून सहा हजार 765 रुपयांची रोख रक्कम, 15 हजार रुपयांचा मोबाईल, शंभर रुपयांचा कॅल्क्‍युलेटर व मटक्‍याच्या पावत्यांच्या नोंदवह्या असा एकूण 21 हजार 870 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस नाईक संदीप लोंढे यांनी दिली असून, अजय अहिवळे याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. 

पुढील तपास पोलिस नाईक विक्रांत लावंड करीत आहेत. अन्य एका टाकलेल्या छाप्यात याचदिवशी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जयभवानी कॉम्प्लेक्‍स येथील हॉटेल आसराशेजारी नीलेश राजेंद्र विटकर (रा. घडसोली मैदान, फलटण) हा बेकायदेशीरपणे कोणताही परवाना नसताना राजधानी नावाचा मटका घेताना मिळून आला. त्याच्याकडे 720 रुपये, चार हजार रुपयांचा मोबाईल व पेन असा चार हजार 725 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस नाईक महेश बोडरे यांनी दिली असून, नीलेश विटकर याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार फरांदे करीत आहेत.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुणे-सातारा-कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

करकायदा : ‘एमडीआर’वरील जीएसटी

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

Pune Weather: पुण्यात पुन्हा ढगांची दाटी; पुढील दोन-तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

SCROLL FOR NEXT