Satara Crime News 
सातारा

पंधरा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी वनरक्षक एसबीच्या जाळ्यात

सिध्दार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चोरे येथील वनरक्षकास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. राहुल बजरंग रणदिवे (वय 34, रा. विलासपूर, गोडोली) असे संबंधित संशयिताचे नाव असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अविनाश जगताप यांनी दिली. 

या घटनेने वन विभागात खळबळ उडाली आहे. लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी संबंधित वनरक्षक रणदिवे याने तक्रारदारास 25 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यांच्यामध्ये झालेल्या तडजोडीअंती संबंधितात 15 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार ते देत असताना वनरक्षक रणदिवे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक जगताप, श्री. ताटे, श्री. खरात, श्री. येवले यांनी रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा, पोलिस उपाधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या घटनेने वन विभागात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : गॅससाठी नागरिकांच्या रांगाच रांगा

SCROLL FOR NEXT