Satara Latest Marathi News 
सातारा

वडूजमध्ये मतदान अधिकाऱ्यास महसूल कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण

संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या मायणी येथील प्रसाद महामुनी या शिक्षकास वडूज तहसील कचेरीसमोरच महसूल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्याबाबतची फिर्याद घेण्यास पोलिसांनी चालढकल केल्याने शिक्षक संघटना संतप्त झाल्या आहेत. संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. 

मायणीतील प्रसाद महामुनी हे कठरेवाडी येथे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांना चितळी (ता. खटाव) येथील मतदान केंद्रावर मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मतदान संपल्यानंतर मतदान साहित्य जमा करण्यासाठी सर्व सहकाऱ्यांसोबत ते वडूजला गेले. नियोजित टेबलवर साहित्य जमा करीत असतानाच त्यांना एका मित्राने मेनरोडवर वाहतूक कोंडी झाली असून लोकांनी तुमच्या गाडीची हवा सोडली असल्याचे सांगितले. त्यामुळे महामुनी यांनी तातडीने गाडीकडे गेले. तेथे निवास कदम व सात ते आठ महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महामुनींना शिवीगाळ करत मारहाण केली. अन्य शिक्षक सहकाऱ्यांनी मारहाणीतून त्यांची सुटका केली. 

मारहाण केल्याबाबत तक्रार देण्यासाठी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधीसह महामुनी वडूज पोलिस ठाण्यात गेले. पोलिस अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी करून येण्यास सांगितले. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयात ते गेले. तेथे संबंधित डॉक्‍टरांनी वैद्यकीय प्रमाणपत्र पोलिसांकडे पाठवतो, असे त्यांना सांगितले. परत गेल्यानंतर पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली, असे महामुनी यांनी सांगितले.

तुम्ही गाडी रस्त्यावर लावून बारमध्ये गेला होता, असा खोटा आरोप करत पोलिसांनी तहसील कचेरीसमोरील बारमालकांना बोलावून घेतले. पोलिसांना सोबत जाऊन बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये कुठेही मी दिसून आलो नाही, असे महामुनी यांचे म्हणणे आहे. न्यायासाठी शिक्षक संघटनांनी तहसीलदारांचे दार ठोठावले आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले असून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT