Satara Latest Marathi News 
सातारा

'RAW'चा अधिकारी सांगणाऱ्या गवडीतील तोतयास सातारा पोलिसांनी देवकलात केली अटक

गिरीश चव्हाण

सातारा : पोलिस अधिकाऱ्याचा वेश परिधान करत रॉ गुप्तचर यंत्रणेचा अधिकारी असल्याचे सांगून तोतयागिरी केल्याप्रकरणी गवडी (ता. सातारा) येथील नयन राजेंद्र घोरपडे (वय 23) याला काल सातारा तालुका पोलिसांनी देवकल येथे ताब्यात घेतले. याप्रकरणी घोरपडेवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

सातारा तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी काल महाशिवरात्री निमित्ताने देवकल येथे गस्तीवर होते. गस्तीवेळी त्यांना एक युवक पोलिसाच्या वेशात थांबल्याचे दिसले. त्यांनी उपनिरीक्षकीचा वेश घातलेल्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने मी सहज फिरण्यास आलो आहे असून माझे कार्यालय नवी दिल्ली येथे असून मी रॉ मध्ये एजंट म्हणून काम करतो, चौकशीदरम्यान त्याने स्वत:चे नाव नयन राजेंद्र घोरपडे (वय 23, मुळ रा. गवडी, सध्या रा. शनिवार पेठ, सातारा) असे सांगितले. 

Breaking News : प्रभाकर घार्गे, मनोज घोरपडे, संग्राम घोरपडेंसह 20 जणांवर खुनाचा गुन्हा 

चौकशीत संशय आल्याने गस्तीवरील पोलिसांनी इतर प्रश्‍न नयनला विचारणे सुरु केले. चौकशीत तो वेगवेगळी माहिती सांगू लागल्याने त्याच्यावरील संशय बळावला. यानंतर त्यास ताब्यात घेत सातारा तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले. याठिकाणी त्याच्याविरोधात हवालदार सुजित भोसले यांनी फिर्याद नोंदविली आहे. तक्रारीनुसार घोरपडेवर तोतयेगिरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हवालदार महेंद्र पाटोळे करीत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT