Satara Crime news vehicle theft for glamour police action gang arrested
Satara Crime news vehicle theft for glamour police action gang arrested  sakal
सातारा

Satara Crime News: माध्यमांवर प्रसिध्दी मिळावी म्हणून दुचाकींची चोरी; शिरवळमध्ये टोळी जेरबंद

अशपाक पटेल

शिरवळ : येथील परिसरातील दुचाकी चोरून समाज माध्यमांवर प्रसिध्दी मिळावी या उद्देशाने दुचाकी चोरणा-या टोळीला जेरबंद करण्यात शिरवळ पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणी योगेश संदिप बाबर (वय १८ , रा. उडतरे ता. वाई), ओंकार संदिप बाबर (वय २१ रा. केंजळ ता. वाई) या दोन युवकांना शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे.

तर दोन अल्पवयीन मुलांना ही ताब्यात घेण्यात आले आहे .असे एकुण चार जणांना ताब्यात घेण्यात शिरवळ पोलिसांना यश मिळाले. तर दोन दुचाकी जप्त करण्यात आले आहे. यासंबधी शिरवळ पोलिसांनी सांगितले कि, शिरवळ गावचे हद्दीतील आझाद गल्ली याठिकाणी घराच्या पार्किंगमधील दुचाकी (क्रमांक एम.एफ.बी. ९८५४ ) २९ डिसेंबर २०२२ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेची फिर्यादीनुसार शिरवळ पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अनिल बारेला हे करीत आहे. दरम्यान संबधीत दुचाकी चोरटे हे वाई तालुक्यातील भुईंज पोलीस ठाणे हद्दीतील असल्याची माहिती शिरवळ पोलीस निरिक्षक नवनाथ मदने यांना गोपनीय माहितीद्वारे मिळाली.

त्यानुसार पोलीस अधिक्षक समीर शेख ,अप्पर पोलीस अधिक्षक बाप्पु बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक श्नवनाथ मदने, सहा. पोलीस उपनिरिक्षक अनिल बारेला, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सुनिल मोहरे, नितिन महांगरे,

दत्तात्रय धायगुडे, प्रशांत वाघमारे, मंगेश मोझर यांच्या पथकाने भुईज पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरिक्षक रमेश गर्ज व पोलीस अंमलदार विकास देशमुख, रविंद्र वर्णकर मदतीने उडतरे येथील युवकाला ताब्यात घेतले.

यावेळी युवकाकडे चौकशी केली असता दुचाकी चोरीमध्ये दोन युवकांना ताब्यात घेतले तर यामध्ये आणखी महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या दोन अल्पवयीन युवकांसह एकूण चौघांचा समावेश आहे. संबधीत टोळीकडुन शिरवळ व सातारा पोलीस ठाणे हद्दीतील दोन दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT