patan 
सातारा

भर पावसात झाडावर बसून पिकांची राखण

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि. सातारा) ः वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे पेरणी केल्यापासूनच शिवार राखणीची वेळ निवी (ता. पाटण) परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. सध्या भर पावसात तेथील शेतकरी झाडांवर निवारा करून मचानावर रात्रभर जागता पहारा देत आहेत. रानडुकरांसह अन्य जंगली प्राण्यांना पळवून लावण्यासाठी वाजवण्यात येणाऱ्या डब्यांच्या आवाजाने परिसर दणाणून निघत आहे. 

सातारा व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या आणि चारीही बाजूंनी घनदाट जंगलांनी वेढलेल्या निवी, कसणी, निगडे, घोटील आणि त्या परिसरातील वाड्यावस्त्यांत वन्यप्राण्यांचा उपद्रव वर्षागणिक वाढतच चालला आहे. हातातोंडाशी आलेली पिके रानडुकरे आणि गव्यांच्या कळपांकडून फस्त केली जात असल्याने शेतकरी रात्रं-दिवस शिवाराला पहारा देतात. अगदी पेरलेले धान्यही रानडुकरे उकरून खात असल्याने खरीप आणि रब्बीची पेरणी केल्यापासून शेतकरी पहारा देतात. त्यासाठी शिवारातील झाडांच्या मजबूत फांद्यांवर मचान उभारली जातात. पाण्याची बाटली, जेवण व बॅटरी घेऊन सायंकाळी सात-साडेसातच्या सुमारास शेतकरी तिकडे रवाना होतात. मचानाला बांधलेले पत्र्याचे डबे वाजवून प्राण्यांना पळवून लावले जाते. पावसाळ्यात पावसातही राखण सुरूच असते. 

सध्या त्या परिसरात भुईमूग, संकरित ज्वारी व कडधान्याची पेरणी झाली असून लवकरच तेथे भातरोप लावणीलाही सुरवात होईल. पेरणी केल्यापासून शेतकरी रात्री शिवारातच मुक्कामी थांबत आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी झाडांवर बांबू व प्लॅस्टिक कागदाचा वापर करून मचानही बांधलेली आहेत. पेरणीनंतर पीक उगवून येईपर्यंत डुकरांचा आणि तेथून पुढे डुकरे, वानरे आणि गव्यांच्या कळपांचा शिवारात धुमाकूळ वाढतो. त्यामुळे राखण करावी लागते, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 


यावर्षी लॉकडाउनमुळे मुंबईकर गावी असल्याने बरेच पडीक क्षेत्रही लागवडीखाली आले आहे. पेरणीच्या पहिल्या दिवसापासूनच शिवारात झाडांवर बसून राखण सुरू आहे. 

- मारुती पाटील, अध्यक्ष, वन व्यवस्थापन समिती, निवी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur Highway Accident : टायर फुटून क्रूझर थेट ट्रकवर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू; गाडीचा चुराडा

Latest Marathi News Live Update : मुंबईत एसीबीची मोठी कारवाई! सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडलं

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

Google चा मोठा खुलासा! Zero Day मुळे धोक्यात आलेत 3.5 अब्ज क्रोम वापरकर्ते; आत्ताच 'हा' एक बदल नाही केला तर डेटा होऊ शकतो गायब

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

SCROLL FOR NEXT