सातारा येथे होणाऱ्या महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेसाठी माती आणि गादीचे आखाडे तयार
सातारा येथे होणाऱ्या महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेसाठी माती आणि गादीचे आखाडे तयार  sakal
सातारा

सातारा : कुस्ती आखाड्याच्या मातीची मशागत

गिरीश चव्हाण

सातारा : सातारा येथे होणाऱ्या महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेसाठी माती आणि गादीचे आखाडे तयार करण्‍याचे काम सध्‍या त्या ठिकाणी सुरू आहे. स्‍पर्धेदरम्‍यान तयार करायच्‍या माती आखाड्यासाठी दहा ट्रक लाल माती आणण्‍यात आली आहे. माती चाळून त्‍यात शेकडो लिटर तेल, हळकुंडे, काव, दूध, तूप, दही आणि शेकडो लिंबांचा रस पिळून आखाड्यातील मातीची मशागत सध्‍या सुरू असून त्‍यासाठी जिल्‍हा तालीम संघाचे पदाधिकारी झटत आहेत.

महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेचे यजमानपद जाहीर झाल्‍यानंतर त्‍याचे शिवधनुष्‍य पेलत साहेबराव पवार, दीपक पवार, सुधीर पवार व जिल्‍हा तालीम संघातील इतर सहकारी गेले काही दिवस स्‍पर्धा यशस्‍वीतेसाठी झटत आहे. ही स्पर्धा मंगळवारपासून (ता. ५) सुरू होणार असून त्‍याची तयारी अंतिम टप्‍प्‍यात आली आहे. स्‍पर्धेची मुख्‍य लढत शनिवारी (ता. ९) सायंकाळी होणार असून त्यासाठी जिल्‍हा क्रीडा संकुलात मातीचे दोन, तर गादी प्रकारातील तीन आखाडे तयार करण्‍यात येत आहेत. माती आखाड्यासाठी दहा ट्रक माती आणली आहे. या मातीच्‍या मदतीने आखाडा करतानाच त्‍यात आवश्‍‍यक घटक पदार्थ मिसळण्‍याचे काम सध्‍या त्या ठिकाणी सुरू आहे. माती चाळल्‍यानंतर ती आखाड्यात ओतत त्‍यात शेकडो लिटर तेल, शेकडो लिटर हळकुंडे व हळद, दूध, दही तसेच तूप आणि शेकडो लिंबे व त्‍याचा रस मिसळण्‍यात येत आहे. या प्रक्रियेसाठी सुमारे चार लाखांचा खर्च असून त्‍याची जबाबदारी जिल्‍हा तालीम संघाने पेलली आहे.

मल्‍लांची ११ ठिकाणी निवासव्यवस्था

स्‍पर्धेसाठी राज्‍यभरातून सुमारे ९०० मल्‍ल, १०० प्रशिक्षक, १०० पंच येणार आहेत. हे मल्‍ल, प्रशिक्षक, पंच यांच्‍या निवासाची जिल्‍हा तालीम संघ तसेच जिल्‍हा प्रशासनाने ११ ठिकाणी सोय केली असून त्‍याचबरोबरच नाष्‍टा, जेवण व इतर आवश्‍‍यक सुविधा पुरविण्‍यासाठी त्‍या ठिकाणी बल्‍लवाचार्य नेमण्‍यात येणार आहेत. परराज्‍य तसेच परजि‍ल्‍ह्यातून येणाऱ्या मल्‍लांना नेणे-आणण्‍यासाठी जिल्‍हा तालीम संघाने ११ छोटी वाहने तसेच रेल्‍वेस्‍थानकावरून येणाऱ्या मल्‍लांना निवास व्‍यवस्‍थेपर्यंत आणण्‍यासाठी दोन बस ठेवण्यात आल्या आहेत.

मल्‍लाला दररोज एक लिटर दूध

स्‍पर्धेदरम्‍यान मल्‍लाला आवश्‍‍यक असणारे पोषक खाद्य व इतर डायट देण्‍यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. स्‍पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्‍येक मल्‍लास सकाळी अर्धा आणि संध्‍याकाळी अर्धा लिटर दूध देण्‍यात येणार असून पाच दिवसांत अंदाजे १० हजार लिटर दुधाचे वाटप येथे स्‍वामी समर्थ मिल्‍क डेअरीच्‍या वतीने करण्यात येणार असल्‍याची माहिती सुधीर पवार यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT