Dam esakal
सातारा

Satara Dam : तारळी धरणाची गळती तीन तासांनंतर बंद

पाण्याचा विसर्ग २५ एप्रिलपासून सुरूच होता. त्यापूर्वी संबंधित ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे कदाचित पाइप लिकेज झाली असावी, असा अंदाज आहे. पाइप लिकेजमुळे कोणतीही हानी झाली नाही.

सकाळ वृत्तसेवा

तारळे - येथील तारळी धरणाच्या सर्व्हिस गेटच्या मागील पाइप फुटून पाण्याची गळती सुरू झाली होती. कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी लगेच धरणावर धाव घेत इमर्जन्सी गेट सोडून गळती थांबविली. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

अधिक माहिती अशी, आज सायंकाळी चारच्या सुमारास अचानक सर्व्हिस गेटच्या मागील पाइप फुटून पाण्याची गळती सुरू झाली. यामुळे धरणाच्या भिंतीकडे उलटा प्रवाह उडू लागला होता. कर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांना कल्पना दिली. त्याबरोबर यांत्रिकी विभागाचे उपअभियंता एस. एम. कानडे, कनिष्ठ अभियंता व्ही. पी. बचुटे, कनिष्ठ अभियंता अनिकेत शिंदे यांनी तातडीने धरणस्थळ गाठले.

सुरू असलेल्या गळतीची पाहणी करून ती थांबविण्यासाठी त्वरित हालचाली करीत धरणाचे इमर्जन्सी गेट खाली सोडण्यात आले. सुमारे तीन तासांनी पाण्याचा प्रवाह बंद करण्यात अधिकाऱ्यांना यश आले. यानिमित्ताने २०१७ च्या पानी गळतीची आठवण झाली. पाल यात्रेनिमित्त वाळवंटात दुकाने थाटण्यास व्यापारी लोकांनी प्रारंभ केला होता.

मात्र, मुरुड येथील तारळी धरणाचे क्विक सर्व्हिस गेटचे बोनेट अचानक तुटून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह नदीपात्रात मिसळून नदीची पाणी पातळी प्रचंड वाढली. वाळवंटात पाणी पसरू लागल्याने यात्रेवर संकट आले होते. सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी धरणावर धाव घेत पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला होता.

पाण्याचा विसर्ग २५ एप्रिलपासून सुरूच होता. त्यापूर्वी संबंधित ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे कदाचित पाइप लिकेज झाली असावी, असा अंदाज आहे. पाइप लिकेजमुळे कोणतीही हानी झाली नाही.

अथवा पाणी वाया गेले नाही. अधिकृत केलेला विसर्ग इतकाच विसर्ग पाइप फुटूनही झाला. त्यामुळे काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले, असे उपअभियंता एस. एम. कानडे यांनी दैनिक ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT