rain sakal
सातारा

सातारा : कोयना वगळता धरणे ‘ओव्हर फ्लो’

पाणीपातळी समाधानकारक, कोयना ३० टीएमसीवर

सकाळ वृत्तसेवा

पाटण : दीड महिना दडी मारलेल्या मॉन्सूनचे दमदार आगमन झाले आहे. गेले चार दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून कोयना धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असून कोयना धरणाने आज ३० टीएमसीचा टप्पा ओलांडला. तालुक्यातील मराठवाडी, उत्तरमांड व तारळी मध्यम प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. मोरणा-गुरेघर, महिंद आणि चिटेघर लघुपाटबंधारे प्रकल्प भरून वाहू लागले आहेत. तालुक्यातील सर्व ओढे, नाले व नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने समाधान होत आहे.

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीतील भूस्‍खलनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पावसाबाबत लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. मात्र, जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपूनही मॉन्सूनने हजेरी लावली नव्हती. संपूर्ण खरीप हंगामातील पिके व तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच काही तांत्रिक कारणांमुळे मोरणा-गुरेघर व मराठवाडी धरणातील संपूर्ण पाणी मे महिन्यापर्यंत सोडून दिले होते.

पाऊस नसल्याने खरीप पेरण्या रखडलेल्या आणि धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. महिनाभर दडी मारलेल्या मॉन्सूनच्या पावसाचे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी दमदार आगमन झाले. काही काळ पश्चिम घाटात कोसळणाऱ्या पावसाने दोन दिवसांत संपूर्ण तालुक्यात पाणी पाणी केले. गेले तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आटलेले ओढे, नाले व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. कोयना धरणाच्या पाणीपातळीत पाच दिवसांत पडलेल्या पावसाने झपाट्याने वाढ झाली आहे. पाणीसाठ्याने ३० टीएमसीचा टप्पा आज पार केला. दोन दिवसांपूर्वी मोरणा-गुरेघर मध्यम प्रकल्प आणि चिटेघर व महिंद लघुपाटबंधारे प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. उत्तर मांड व तारळी मध्यम प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा आहे. दोन दिवसांत या दोन प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग करण्यात येईल, अशी शक्यता आहे. तालुक्यातील धरणांचा पाणीसाठा समाधानकारक आहे.

मराठवाडीही लवकरच भरणार

मराठवाडी प्रकल्पाच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण पाणीसाठा करण्यात येणार आहे. त्यातच तांत्रिक कारणांमुळे किंवा देखभाल दुरुस्तीसाठी यावर्षी या प्रकल्पातील पाणी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण सोडून दिले होते. त्यामुळे हा प्रकल्प ओव्हर फ्लो होण्यासाठी काही कालावधी लागेल. मुसळधार पावसाचे प्रमाण कमी न झाल्यास लवकरच हे धरणही ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT