satara sakal
सातारा

सातारा : पिंपळांमुळे कृष्णा पुलाला धोका

तातडीने झाडे तोडून पुलाच्या दुरुस्तीची गरज

सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव : सातारा-कोरेगाव रस्त्यावरील कृष्णा नदीवरील १०७ वर्षे आयुर्मान झालेल्या कृष्णा पुलाच्या दुतर्फा संरक्षक कठड्यांमध्ये उगवलेल्या पिंपळाच्या झाडांमुळे धोका निर्माण झाला आहे. झाडे तातडीने न तोडल्यास कठडे कोसळून गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सातारा ते कोरेगाव, पुसेगाव, म्हसवड, पंढरपूर, सोलापूर या मार्गादरम्यान असलेला कृष्णा नदीवरील कृष्णा पूल हा दैनंदिन दळणवळणासाठी महत्त्‍वाचा आहे. हा पूल ब्रिटिशकालीन आहे. मुंबई प्रांताचे लॉर्ड विल्सन यांच्या हस्ते २७ जून १९१५ रोजी या पुलाचे लोकार्पण झाले. या पुलाला ‘द विल्सन ब्रिज’ असे नाव देण्यात आले. या पुलाच्या

कृष्णा पुलाला आता समांतर पूल!

दरम्यान, सातारा-सोलापूर या राज्यमार्गाचे रूपांतर आता महामार्गात झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हा रस्ता वर्ग झाला आहे. महामार्गाचे काम पूर्णत्वास आले आहे. आता या कृष्णा पुलासह अन्य सहा पुलांची कामे शिल्लक असल्याचे महामार्ग ठेकेदाराकडून सांगण्यात आले. या महामार्गाच्या कामात ‍सध्‍याचा कृष्णा पूल ‘जैसे थे’ ठेवून त्याला समांतर सुमारे नऊ मीटर रुंदीचा नवीन पूल उभारण्यात येणार आहे. तोपर्यंत या पुलाच्या दुतर्फा कठड्यांमध्ये वाढलेली पिंपळाची झाडे तातडीने तोडून पुलाची आतून- बाहेरून दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक, प्रवासी, नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cigarette: धूम्रपान करणाऱ्यांना मोठा धक्का! सिगारेटच्या किमती ५५ रुपयांनी वाढल्या; तुमच्या आवडत्या ब्रँडचा नवीन दर किती? जाणून घ्या...

PAK vs AUS: पाकिस्तानी चिटर! Out नसताना ऑस्ट्रेलियन फलंदाजाला अंपायरने दिले बाद, Video Viral

Rohit Shetty murder plot : लॉरेन्स टोळीने रचला होता रोहित शेट्टीच्या हत्येचा कट? ; ‘FIR’मधून खळबळजनक माहिती उघड!

Latest Marathi News Live Update: कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार जाहीर, 6 जणांचा होणार सन्मान

Urdu Schools Timing: उर्दू शाळांच्या वेळा बदलणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारण काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT