कोरोना 
सातारा

ज्‍वेलर्स व्‍यावसायिकाच्‍या मृत्‍यूबाबत संभ्रम... मल्‍हारपेठ बाजारपेठेत खळबळ

सकाळ वृत्तसेवा

मल्‍हारपेठ (जि. सातारा) : बनपुरी, हावळेवाडीनंतर होम क्वारंटाइन असलेल्या मल्हारपेठमधील एका ज्वेलर्स व्यावसायिकाच्या अचानक मृत्यूमुळे मल्हारपेठ बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. मृत्यूपश्‍चात मृतदेहाचे स्वॅब नमुने तपासणी करू नये, असा आदेश आरोग्य विभागाकडून दिला गेल्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत संभ्रम कायम आहे. 

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, संबंधित ज्वेलर्स व्यावसायिक आठ दिवसांपूर्वी कोलकत्याहून विमान प्रवास करून मल्हारपेठला आला होता. त्यानंतर दुकानाच्या मागील बाजूस तो एकटा राहात होता. मल्हारपेठ आरोग्य विभाग व ग्रामदक्षता समितीने त्यास होम क्वारंटाइन केले होते. दरम्यान, काल त्याच्या दुकानचे शटर बंद असल्याने शेजारील नागरिकांनी तपास केला असता संबंधित व्यक्ती इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरच्या शौचालयाशेजारी मृत आढळून आली. त्याबाबत आरोग्य विभागास कळविण्यात आले. तालुका आरोग्य विभागाने तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय निर्देशानुसार मृतदेहावर पाटण येथे अंत्यसंस्कार केले. 

या घटनेमुळे मल्हारपेठ बाजारपेठेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. गजबजलेली नागरी वस्ती असतानाही मल्हारपेठ संसर्गापासून कोसो दूरच राहिला आहे. अगदी हाकेच्या अंतरावरील नवसरी गावात रुग्ण सापडले असताना मल्हारपेठ मात्र बाधित होण्यापासून लांब होती. मात्र, काल ज्वेलर्स व्यावसायिकाचा मृत्यू कशामुळे झाला असावा, याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, मल्हारपेठ बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी वर्गानेच घेतल्यामुळे येथे पुन्हा एकदा सन्नाटा पसरला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापुरात पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज! मुंबईतून एकजण सोलापुरात आला अन्‌ ९५० ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज देऊन गेला, पोलिसांचे पथक मुंबईला रवाना, वाचा...

आजचे राशिभविष्य - 14 मे 2026

Sattu Buttermilk Recipe: उन्हाळ्याच्या कडाक्यात शरीराला आतून थंडावा देणारं सुपर देसी ड्रिंक! घरच्या घरी झटपट बनवा 'सत्तूचं ताक'

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

SCROLL FOR NEXT