Satara 
सातारा

स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील घसरण पाचगणीकरांसाठी चिंताजनक

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्राला दिशादर्शक ठरणाऱ्या पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेची पहिल्या क्रमांकावरून 14 व्या स्थानावर झालेली घसरण चिंताजनक असून, नगराध्यक्षा, उपाध्यक्ष, नगरसेवक, पालिका प्रशासन आणि पाचगणीकरांना हा निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. 

स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल काल जाहीर झाला. पाचगणी पालिकेने सातत्याने गेले तीन वर्षे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये चांगले काम केले; परंतु यावर्षी नेहमीप्रमाणेच काम करूनही पालिकेला या स्पर्धेत अपयश का आले? यावर्षीचे काम स्पर्धेच्या दृष्टीने साधक- बाधक झाले नाही का? सर्वांचाच फाजील आत्मविश्वास नडला? की गेले काही वर्ष सत्तेसाठी सुरू असणाऱ्या राजकीय कुरघोड्यांचा परिणाम या निकालावर दिसला अशा ऐक ना अनेक विषयांची चर्चा सध्या पाचगणीत सुरू आहे. या पलीकडे जाऊन या अभियानात कोसो दूर असणाऱ्या लगतच्याच महाबळेश्वर पालिकेने दहाव्या क्रमांकावर घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. पाचगणी आणि महाबळेश्वर या दोन्ही पालिकांचा कार्यभार ऐकाच मुख्याधिकाऱ्यांकडे होता. पाचगणी पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर पालिका पदाधिकऱ्यांकडूनच अवाजवी रान उठवले गेले, तर सत्तेसाठी बऱ्याचदा घमासान पाहायला मिळाले. 

पाचगणी शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. नगरसेवकांनीही आपापल्या परीने योगदान दिले. मग माशी कुठे शिंकली हा प्रश्न उपस्थित होतो आहे. शहरातील समस्त नागरिक, व्यापारी, पर्यटकांनाही स्वच्छतेची सवय लागली होती. पालिकेनेही या स्पर्धेसाठी भरमसाठ खर्च केला होता, तरीही या स्वच्छ अभियान स्पर्धेतील घसरण चिंताजनक आणि सर्वांनाच आत्मपरीक्षण करायला लावणारी बाब आहे. 

पाचगणीच्या शहर स्वच्छता, विकास कामांसंदर्भात हेवेदावे करण्यापेक्षा सत्तेसाठी आणि एकामेकांची जिरवा जिरवी करण्यात धन्यता मानणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केलेला इथपर्यंतचा प्रवासही याला कारणीभूत आहे का, असा प्रश्न जाणकारांनी विचारला आहे. या अपयशाला जबाबदार कोण? याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. 


अन्यथा प्रथम क्रमांकाचा राहील केवळ इतिहास! 

स्वच्छतेत घसरलेल्या बाबीचा आता खोलात जाऊन विचार करण्यापेक्षा नगराध्यक्षा, उपाध्यक्ष, नगरसेवक, पालिका प्रशासन, पाचगणीकरांनी व सर्व जबाबदार घटकांनी आत्मपरीक्षण करून याची कारणे शोधायला हवीत. तरच पुढील काळात पालिकेने मिळवलेले स्वच्छतेमधील वैभव पुन्हा मिळण्यास मदत होणार आहे. अन्यथा स्वच्छता अभियानात एका वर्षी पालिका प्रथम क्रमांकावर होती, हा इतिहास राहणार आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT