patan 
सातारा

लॉकडाउनमध्ये चक्क विळे, खुरप्याला मागणी

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि. सातारा) ः लॉकडाउनच्या काळात मुंबईसह विविध शहरांतून गावी परतलेली चाकरमान्यांची कुटुंबे गावाकडे शेतीच्या कामात व्यस्त आहेत. वर्षानुवर्षे पडीक असलेले क्षेत्रही त्यांनी लागवडीखाली आणल्याने विळे, खुरप्यासह अन्य शेती औजारे बनवून घेण्याबरोबरच त्यांच्या खरेदी व दुरुस्तीसाठी स्थानिक कारागिरांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. दर वर्षीपेक्षा यंदा व्यवसायात दुपट्टी- तिप्पटीने वाढ झाल्याचे कारागीर सांगत आहेत. 

नोकरी, व्यवसायनिमित्ताने बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या या परिसरातील नागरिकांनी कोरोनाचा प्रभाव वाढत चालल्यानंतर कुटुंबीयांसह गावचा रस्ता धरला. अजूनही हा ओघ सुरूच आहे. गावाकडे आल्यावर या मंडळींनी शेतीत लक्ष घातले. पेरणीपूर्व मशागतीच्या दोन-तीन फेऱ्या करून शिवारे चकाचक केली. डोंगर कपारीतील जी शेती सोडून ते शहरात गेले होते, ती वर्षानुवर्षाची पडीक शेतीही अनेकांनी लागवडीखाली आणली असून, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शिवारे गजबजलेली दिसत आहेत. सध्या या विभागात भांगलणी, कोळपणी आदी आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. लवकरच डोंगरी भागात नाचणी व भात रोप लावणीलाही सुरुवात होणार आहे. 

गावोगावी विळे, खुरप्यासह अन्य शेती औजारांच्या खरेदी व दुरुस्तीसाठी स्थानिक कारागिरांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. दर वर्षीपेक्षा यंदा व्यवसायात दुपट्टी- तिप्पटीने वाढ झाल्याचे कारागीर सांगत आहेत. सणबूर येथील कारागीर दयानंद सुतार व नित्यानंद सुतार म्हणाले, ""पोटापाण्यासाठी परगावी असणारे चाकरमानी कुटुंबासह गावी थांबल्याने शेतामध्ये भांगलणी, खुरपणी वेगात सुरू आहे. विळे, खुरपी, कुऱ्हाडी, पारळी, कोयता आदी शेती औजारांना धार लावण्यासाठी गर्दी वाढली आहे. दर वर्षीपेक्षा यंदा व्यवसायात दुपट्ट-तिप्पटीने वाढ झालेली असली, तरी आम्ही जुनाच दर कायम ठेवला आहे. "लक्ष्मण' विळ्यासाठी आमची खासियत आहे. सुमारे 80 वर्षांपूर्वी आजोबांनी बनवलेला हा विळा पुढे त्यांच्याच नावाने प्रसिद्ध झाला असून, विळा खरेदीसाठी विविध जिल्ह्यांतून शेतकरी येथे येतात.'' 

पूर्वी शेतकरी शेतीची साधने दुरुस्तीस देऊन निघून जायचे. आता ते स्वतः थांबत आहेत. लोखंड, पोलाद, कोळसा, मजुरीचे दर वाढलेले असले, तरी लॉकडाउनच्या परिस्थितीचा विचार करून जुन्या दरावरच सेवा देत आहोत. 

- दयानंद सुतार, कारागीर, सणबूर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT