टोळी हद्दपार sakal
सातारा

सातारा : कऱ्हाडमधील दोघे एक वर्षासाठी हद्दपार

जिल्ह्यासह सांगलीतील तीन तालुक्यांत बंदी

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : शहर पोलिसांच्या हद्दीत जबरी चोरी, मारहाणीसह खुनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगण्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील दोघांना सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यांतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आज दिले.

श्रीधर काशिनाथ थोरवडे (वय २४) व आतिष सुनील थोरवडे (वय २२, दोघे रा. बुधवार पेठ, कऱ्हाड) अशी त्यांची नावे आहेत. समाजामध्ये दहशत पसरविणाऱ्यासह गुन्हेगारीच्या कारवाया करणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात हद्दपारीच्या कारवाया सुरू आहेत. पोलिस अधीक्षक बन्सल यांनी पदभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत ३५ प्रस्तावातील १३४ जणांना हद्दपार केले आहे. कऱ्हाडच्या दोघांविरोधात शहर पोलिसांत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यावरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी त्यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांना दिला होता. त्यानुसार त्यांनी दोघांना सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. त्याचे आदेश आज त्यांनी दिले. हद्दपार झालेल्या संबंधितांना यापूर्वी पोलिसांनी वेळोवेळी सुधारण्याची संधी दिली होती.

मात्र, त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. त्यांचा सामान्यांना उपद्रव होत होता. त्यांच्यावर कडक कारवाईचाही मागणी होत होती. त्यानुसार त्यांच्या पाठवलेल्या प्रस्तावावर पोलिस अधीक्षकांनी हा आदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drought: पावसाअभावी भातपिके वाळू लागली; मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक

Traditional Farming: ट्रॅक्टरच्या युगातही बैलजोडीचा ध्यास; २२ वर्षांच्या ‘राजा’नंतर खंडेराव बकाल यांनी पुन्हा जपला शेतीचा पारंपरिक वारसा

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

SCROLL FOR NEXT