Satara 
सातारा

नदीकाठच्या क्षेत्रात वन्यप्राण्यांचा उपद्रव, नुकसान भरपाईसह बंदोबस्ताची मागणी

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : डोंगराच्या पायथ्याशी वावरणाऱ्या रानडुकरांनी आता तारळे-पाल हा मुख्य रस्ता ओलांडून नदीकाठच्या क्षेत्रात धुमाकूळ घालत उसाची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या डुकरांच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, नुकसानभरपाईच्या मागणीबरोबरच डुकरांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे. 

विभागात तारळी नदीमुळे, नदीच्या दोन्ही तीरांवर बागायत पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने आले, ऊस, तसेच तरकारी पिकांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये ऊस मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. येथील शेतकऱ्यांनी यासाठी नदीवरून पाण्याच्या खासगी योजना राबविल्या आहेत. अगदी चार ते पाच किलोमीटर पाइपलाइन करून पाणी शेतात नेले आहे. त्यासाठी लाखो रुपयांची कर्जे काढली आहेत. बारमाही पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांना बागायती पिके घेउन आपली प्रगती साधण्याची संधी मिळाली. मात्र, वन्यप्राणी शेतीच्या मुळावर उठल्यामुळे या शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. विभागातील अनेक गावांत डुकरांनी उपद्रव माजविला आहे.

डोंगरातील झाडेझुडपे वाढल्यामुळे तसेच डोंगरपायथ्यापर्यंत उसाचे पीक पसरल्याने जंगलसदृश स्थिती आहे. वन्यप्राण्यांना वाढण्यासाठी व लपण्यासाठी पोषक स्थिती असल्याने त्यांची पैदासही वाढू लागली आहे. यात ससे, रानडुक्कर, मोर, भेकर यांची संख्या भरपुर वाढली आहे. या सर्व प्राण्यांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. सध्याही येथे रानडुकरांचा मोठा त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी रानडुकरांच्या झुंडीच्या झुंडी शेतात फिरून नासधूस करत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विशेषतः डोंगरपायथ्यालगतच्या शेतीला नुकसानीचा सामना करावा लागत होता. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT