patan 
सातारा

कोरोनाच्या धास्तीने ढेबेवाडीकर काळजीत

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) ः काही कोरोना बाधित रुग्णांचा ढेबेवाडीशी संपर्क आल्याने डॉक्‍टरांसह व्यापारी व नागरिकांच्या काळजीत भर पडली आहे. बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असतानाच बाधित रुग्ण सापडलेल्या गावातील नागरिकही ढेबेवाडी व तळमावले येथील बाजारपेठेत गर्दी करत असल्याने आतापर्यंत एकही रुग्ण न सापडलेल्या या दोन्ही बाजारपेठा कोरोनाला निमंत्रण देण्याची भीती व्यक्त होत आहे. 

ढेबेवाडी आणि तळमावले बाजारपेठांत वाड्यावस्त्यांतून खरेदी व अन्य कामानिमित्ताने नागरिक येतात. सध्याच्या लॉकडाउनच्या काळातही तेथील दुकाने, दवाखान्यासह बॅंकांच्या दारात नागरिकांच्या रांगा दिसत आहेत. गेल्या चार महिन्यांत या परिसरात दहा हजारांहून अधिक चाकरमान्यांचे आगमन झाले असून, बाजारपेठांत गर्दी त्यांचीच आहे. आतापर्यंत या भागात 69 बाधित रुग्ण सापडले असून, त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यंतरी काहीसा कमी झालेला रुग्ण वाढीचा वेग पुन्हा वाढल्याने वांग खोरे चिंतेत आहे. कसणीत काल एकाच घरातील नऊ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्याशिवाय निगडे, महिंद येथेही नवे रुग्ण सापडल्याने ढेबेवाडी परिसरावर चिंतेचे सावट आहे. काळजीची बाब म्हणजे यातील काही रुग्ण उपचारासाठी ढेबेवाडीतील एका खासगी व ग्रामीण रुग्णालयातून येऊन गेल्याने डॉक्‍टरांसह व्यापारी व नागरिकांचे टेन्शन वाढले आहे. तळमावले येथील एका खासगी रुग्णालयात प्रसूती झालेली महिला बाधित आढळल्याने डॉक्‍टर क्वारंटाइन झाले होते. मात्र, सुदैवाने डॉक्‍टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने अनेक रुग्णांचा जीव भांड्यात पडला आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुढेंच्या कारवाईनंतर सरकारही अ‍ॅक्शन मोडमध्ये... खोकल्याच्या सिरपबाबत आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!

Pune News: ज्ञानमंदिरांच्या दारातच नशेचा बाजार! राजगुरुनगरात शाळा-महाविद्यालयांजवळ गुटखा, सिगारेटची खुलेआम विक्री

IND A vs AFG A : जर वैभव सूर्यवंशीवर बंदी आली, तर भारताकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला जागा मिळणार?

एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने खरंच सांधेदुखी वाढते का? ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी सांगितलं Body Stifness आणि वेदनांचं खरं कारण

CA जॉबचं आमिष, बार गर्लला लग्नाचं स्वप्न, बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्तीचे संबंध... मुंबईत भाजपच्या बड्या नेत्याचा काळा चेहरा उघड

SCROLL FOR NEXT