Satara 
सातारा

वडूज प्रशासकीय कार्यालयात निघालात?, पाण्याची बाटली बरोबर न्या

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : येथील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये कामकाजासाठी येणाऱ्या लोकांच्या हातात आता कागदपत्रांबरोबरच पाण्याची बाटली दिसू लागली आहे. कोरोना संसर्गामुळे मास्क, सॅनिटायझर ठीक आहे. पण, याठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीच वानवा असल्याने पाण्याचीही सोय स्वत:लाच करावी लागत असल्याचे चित्र आहे. 

जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या परिसरामध्ये लोकांना पाणी पिण्यासाठी पाण्याची टाकी होती. त्याचा चांगला फायदा येथे कामकाजानिमित्त येणाऱ्या लोकांना होत होता, असे सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार शिंदे यांनी सांगितले. नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये गेल्या वर्षी तहसीलदार कार्यालय, दुय्यम निबंधक, कृषी विभाग, वन विभाग, पुरवठा विभाग अशा विविध शासकीय विभागांची कार्यालये कार्यान्वित झाली आहेत. मात्र, येथे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणच्या विविध कार्यालयांत कामकाजानिमित्त आलेल्या लोकांना अनेकवेळा कामासाठी दिवसभर थांबावे लागते. त्यावेळी त्यांना पिण्याच्या पाण्याची दुर्भिक्षता जाणवते. प्रशासकीय इमारतीमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा श्री. शिंदे यांनी दिला आहे. 

सद्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मास्क, सॅनिटायझर अशा दक्षतेच्या वस्तू स्वत:बरोबर वापरत आहेत. या वस्तूंबरोबरच नागरिकांना पिण्यासाठी पाण्याची बाटलीसुद्धा ठेवावी लागत आहे. प्रशासकीय इमारतीत शासनाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष श्रीकांत देवकर यांनी केली आहे. 


पालकमंत्र्यांना भेटून पाठपुरावा करू 

प्रशासकीय इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या माध्यमातून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना भेटून पाठपुरावा करू, असे पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे यांनी सांगितले. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT