Satara 
सातारा

शिक्षक बॅंकेने केलेल्या 100 रुपये कपातीप्रश्‍नी वाद, कायदेशीर लढा देण्याचा इशारा

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेकडून सेवेतील सभासद कुटुंबकल्याण योजना या योजनेंतर्गत प्रत्येक महिन्यात जादाचे 100 रुपये कपात करण्यात येत असून, ही कपात करू नये, अशी मागणी जावळी तालुक्‍यातील 150 सभासदांनी एका निवेदनाद्वारे शिक्षक बॅंकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद परामणे यांच्याकडे केली आहे. 

निवेदनातील अधिक माहिती अशी की, सभासद कुटुंबकल्याण योजनेंतर्गत शिक्षक बॅंकेकडून प्रत्येक महिन्यामध्ये 100 रुपये जादा कपात केली जात आहे. या कपातीवर सभासदाचा कोणताही हक्क असणार नाही. सभासदांना कोणतीही पूर्वसूचना किंवा विचारात न घेता प्रत्येक महिन्यात 100 रुपये जादा कपात सुरू केलेली आहे. ज्या सभासदांना वाटते की आपले 100 रुपये कपात करू नयेत, त्यांनी बॅंकेत तसा अर्ज देणे आवश्‍यक आहे. बॅंकेने केलेली कपात त्वरित सभासदांच्या बचत खात्यावर जमा करावी अन्यथा शिक्षक समिती याबाबत कायदेशीर कारवाई करेल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आलेला आहे. शिक्षक बॅंकेत निवेदन देतेवेळी शिक्षक बॅंकेचे संचालक किरण यादव, सुरेश चिकणे, गजानन वारागडे, विजय बांदल, सुधाकर दुंदळे, विक्रम सावंत, विशाल जमदाडे उपस्थित होते. 


""प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेने सभासदांना विश्वासात न घेता परस्पररित्या 100 रुपये कपात सुरू केली असून ही कपात थांबवावी. कपात केलेली रक्कम त्वरित पुन्हा सभासदांच्या बचत खात्यावर जमा करावी.'' 

-सुधाकर दुंदळे, सरचिटणीस, शिक्षक समिती, जावळी 


""वार्षिक सर्वसाधारण सभा आठ सप्टेंबर 2019 च्या ठराव क्रमांक नऊने पोटनियम मंजूर केल्याप्रमाणे मयत सभासद कुटुंबकल्याण निधी ठेव योजना ही सभासदांच्या हिताची असून, केवळ 100 रुपये कपातीमध्ये कर्जदार सभासदाचे निधन झाल्यास त्या सभासदाच्या वारसांना सात लाख 50 हजार रुपये मदत या योजनेतून देण्यात येते. त्यामुळे ही योजना अन्यायकारक नसून सभासदांसाठी फायदेशीरच आहे.'' 

-शंकरराव जांभळे, संचालक, प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंक 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT