सातारा : जिल्‍ह्यात आज 3 हजार 65 बाप्‍पांचे विसर्जन  
सातारा

सातारा : जिल्‍ह्यात आज 3 हजार 65 बाप्‍पांचे विसर्जन

कोरोनाचा प्रसार रोखण्‍यासाठी शासनाने घालून दिलेल्‍या नियमांना अधीन राहूनजिल्‍हावासियांनी गणेशाचे स्‍वागत केले.

गिरीश चव्हाण

सातारा : दहा दिवस मनोभावे आराधना केल्‍यानंतर सातारकरांनी गणेशाला निरोप देण्‍याची तयारी सुरु केली आहे. परंपरेनुसार आज जिल्‍ह्याच्‍या विविध भागात ३ हजार ६५ सार्वजनिक मंडळांच्‍या मुर्तींचे विधीवत विसर्जन होणार आहे. या विसर्जनासाठीची आवश्‍‍यक ती तयारी जिल्‍हा प्रशासनाने केली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्‍यासाठी शासनाने घालून दिलेल्‍या नियमांना अधीन राहूनजिल्‍हावासियांनी गणेशाचे स्‍वागत केले. यानंतर गौराईचे देखील जल्‍लोषी वातावरणात घरोघरी स्‍वागत करण्‍यात आले. गौरीबरोबरच घरगुती गणेशाचे विसर्जन झाल्‍यानंतर जिल्‍हावासियांना अनंत चतुर्दशीचे वेध लागून राहिले होते. प्रथेप्रमाणे जिल्‍ह्‍यात अनंत चतुर्दशीच्‍या आदल्‍या दिवशी सार्वजनिक मंडळांच्‍या मुर्तींचे विसर्जन करण्‍याची प्रथा आहे. यानुसार आज साताऱ्यात सुमारे ३० तर जिल्‍ह्यात विविध ठिकाणी सुमारे दोनशेहून अधिक सार्वजनिक गणेश मुर्तींचे भक्‍तीभावात विसर्जन झाले.

अंनत चतुर्दशी दिवशी सर्वच सार्वजनिक मंडळांच्‍या तसेच घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन करण्‍यात येते. आज जिल्‍ह्यात ३ हजार ६५ सार्वजनिक मुर्तींचे विसर्जन होणार आहे. यासाठीची तयारी जिल्‍हा प्रशासनाने केली असून बंदोबस्‍तादरम्‍यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. बंदोबस्‍तावर देखरेख करण्‍यासाठी स्‍वतंत्र पोलिस अधिकारी नेमण्‍यात आले असून संवेदनशील ठिकाणी आणि व्‍यक्‍तींवर त्‍यांच्‍या मार्फतीने जास्‍तीचे लक्ष केंद्रित करण्‍यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: मेघगर्जनेसह उष्णतेचा इशारा! राज्यातील 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; हवामान विभागाचा अलर्ट

IND A vs AFG A: वैभव सूर्यवंशीला फायनलमध्ये टार्गेट करणार? श्रीलंकेच्या कर्णधाराने दिलं स्पष्ट उत्तर, 'आमचे खेळाडू कोणालाही...'

EPFO Interest Rate 2026: 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! व्याजदराच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी; खात्यात पैसे कधी जमा होणार?

इराण-व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेची कुणावर नजर? 'त्या' देशाचं नाव घेत डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान, पुन्हा तणाव वाढणार!

Latest Marathi Live Updates: नागपुरातील विद्यार्थ्याला बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

SCROLL FOR NEXT